ETV Bharat / city

Saamna Editorial On China : चीनची युद्धाची खुमखुमी जीरवण्यासाठी भारताने आता रणनिती आखायलाच हवी - संजय राऊत

author img

By

Published : Dec 3, 2021, 12:45 PM IST

Updated : Dec 3, 2021, 1:05 PM IST

युद्धासाठी पुढाकार घेण्याची आणि त्यासाठी 3 लाख तरुण सैनिकांची भरती करण्याची चीनची घोषणा म्हणजे हवेतला गोळीबार समजण्याची चूक न करता त्यामागचे धोके जगाने आणि खास करून आपल्या राज्यकर्त्यांनी समजून घेतले पाहिजेत, असे शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून संपादक संजय राऊत ( Sanjay Raut on China ) यांनी म्हटलंय.

सामना अग्रलेख
Saamna Editorial

मुंबई - चीनला ( China ) युद्धाची खुमखुमी कायमच असते, ती कशी जिरवायची याची रणनीती आता हिंदुस्थानलाही आखावीच लागेल, अशा शब्दात शिवसेनेनं ( Shiv Sena Concerns Over China ) ‘सामना’त ( Saamna Editorial On China's War Strategy ) छापलेल्या लेखामधून केंद्रातील मोदी सरकारला सूचनावजा सल्ला दिला आहे.

युद्धासाठी पुढाकार घेण्याची आणि त्यासाठी 3 लाख तरुण सैनिकांची भरती करण्याची चीनची घोषणा म्हणजे हवेतला गोळीबार समजण्याची चूक न करता त्यामागचे धोके जगाने आणि खास करून आपल्या राज्यकर्त्यांनी समजून घेतले पाहिजेत, असे शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून संपादक संजय राऊत ( Sanjay Raut on China) यांनी म्हटलंय.

चीनला युद्धाची खुमखुमी कायमच असते, ती कशी जिरवायची याची रणनीती हिंदुस्थानलाही आता आखावीच लागेल. चीनला लागलेली साम्राज्यवादाची राक्षसी चटक हा सध्या जगभरासाठी चिंतेचा विषय बनला आहे. चीनचा एकूणच सगळा गोपनीय कारभार, लपूनछपून आखलेली धोरणे आणि कट-कारस्थानांवर आधारित कावेबाज परराष्ट्र धोरण यामुळे जगभरातील तमाम देश चीनकडे कायम संशयानेच पाहत असतात. बाकी जगाचे सोडा, पण चीनची ही युद्धखोर नीती हिंदुस्थानसाठी सदैव डोकेदुखीच ठरली आहे. शी जिनपिंग चीनचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून तर चीनच्या युद्धखोर कारवायांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. कायम गुरगुरत राहणे आणि दंडाच्या बेडक्या फुगवून शक्तिप्रदर्शन करणे, ही चीनची जुनी खोड आहे. आताही चीनने तेच केले आहे. पीपल्स लिबरेशन आर्मी ( People's Liberation Army )अर्थात पीएलए या चिनी सैन्य दलात बंपर सैन्यभरती सुरू करण्याची घोषणा चीनने केली आहे, असे अग्रलेखात म्हटलं आहे.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग ( Xi Jinping ) यांनीच सैन्यामध्ये तब्बल 3 लाख नवीन तरुण सैनिकांची भरती करण्याची योजना जाहीर केली. एरवी आपल्या देशात काय घडतेय, हे जगापासून झाकून ठेवणाऱया आणि लपवाछपवीच्या खेळात माहीर असणाऱया चीनने सैन्य भरतीची घोषणा मात्र लपवून ठेवली नाही. आपल्या सैन्य दलात उत्साह भरणे आणि चीनशी विवाद असलेल्या हिंदुस्थानसारख्या देशांवर दबाब निर्माण करणे, या डावपेचातून जिनपिंग यांनी हे विधान केले असावे, असा समज करून घेत त्याकडे दुर्लक्ष करणे भविष्यात घातक ठरू शकते, असे सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

चिनी लष्कराची उच्च गुणवत्ता, इतर देशांसोबतची लष्करी स्पर्धा जिंकणे आणि भविष्यातील युद्धांमध्ये पुढाकार घेणे, ही चिनी सशस्त्री दलांच्या प्रगतीची गुरुकिल्ली आहे. 2027 मध्ये पीपल्स लिबरेशन आर्मी या चिनी सैन्य दलाच्या स्थापनेचे शताब्दी वर्ष आहे. यापूर्वी चीनच्या सशस्त्री दलांचे संपूर्ण आधुनिकीकरण करण्याबरोबरच तरुणांची मोठय़ा प्रमाणावर सैन्य भरती करण्याचे उद्दिष्ट चीनने निश्चित केले आहे. दरवर्षी तब्बल 209 अब्ज डॉलर्स इतकी प्रचंड रक्कम चीन लष्करावर खर्च करतो. लष्करी खर्चासाठी दरवर्षी इतके प्रचंड बजेट राखून ठेवणारा चीन हा जगातील एकमेव देश असताना युद्ध जिंकण्याची क्षमता बळकट करणे, हे आपले अंतिम ध्येय असले पाहिजे आणि वैज्ञानिक, तांत्रिक ज्ञान आणि क्षमता वाढवून आधुनिक युद्ध जिंकण्यासाठी सज्ज व्हा, अशी हाक चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्या सैन्य दलास दिल्याचे राऊत यांनी सामनात म्हटलंय.

Last Updated : Dec 3, 2021, 1:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.