ETV Bharat / city

50 बंडखोर आमदारांना मनसेत प्रवेश देणार का? राज ठाकरेंनी जाहीर केली भूमिका

author img

By

Published : Jul 24, 2022, 12:47 PM IST

Updated : Jul 24, 2022, 12:54 PM IST

ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीसह इतर जिल्हास्तरावरील अनेक पालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही ( Local Self-Government ) शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा शिंदे ( CM Eknath Shinde ) गटाला पाठिंबा आहे. त्यामुळेच 'शिंदे सेना हीच खरी शिवसेना आहे' असा दावा आता बंडखोर गटाकडून केला जातोय. निवडणूक आयोगाने ती मान्य न केल्यास एकनाथ शिंदे यांना त्यांच्या समर्थकांसह कोणत्या ना कोणत्या पक्षात विलीन व्हावे लागेल. अशा परिस्थितीत शिंदे गटाचा मनसे विलीनीकरणाचा प्रस्ताव आल्यास राज ठाकरे हा प्रस्ताव स्वीकारतील का? यावर राज ठाकरे यांनी सकारात्मक उत्तर दिले आहे.

Raj Thackeray
राज ठाकरे

मुंबई - विधानसभा आणि लोकसभेत दोन तृतीयांश आमदार-खासदारांचे बहुमत असल्याचा एकनाथ शिंदे यांचा दावा आहे. तर, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीसह इतर जिल्हास्तरावरील अनेक पालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटाला पाठिंबा आहे. त्यामुळेच 'शिंदे सेना हीच खरी शिवसेना आहे' असा दावा आता बंडखोर गटाकडून केला जात आहे. निवडणूक आयोगाने ती मान्य न केल्यास एकनाथ शिंदे यांना त्यांच्या समर्थकांसह कोणत्या ना कोणत्या पक्षात विलीन व्हावे लागेल. अशा परिस्थितीत शिंदे गटाचा मनसे विलीनीकरणाचा प्रस्ताव आल्यास राज ठाकरे( Raj Thackeray ) हा प्रस्ताव स्वीकारतील का? यावर राज ठाकरे यांनी सकारात्मक ( Raj Thackerays Reaction ) उत्तर दिले आहे.



ते माझेच जुने सहकारी - यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "तसे असल्यास, मी त्याचा विचार करेन." असे उत्तर देऊन राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. राज ठाकरे म्हणाले, 'एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचे आमदार हे माझे जुने मित्र आहेत. अशी शक्यता मला माध्यमांकडूनच कळली. ही तांत्रिक बाब आहे. पण जर शिंदे यांची गरज भासली आणि त्यांच्या बाजूने प्रस्ताव आला तर मी त्यांच्या 40 जणांना माझ्या पक्षात सामावून घेण्याचा विचार करेन.'' असे राज ठाकरे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.



तो विश्वास ठेवण्यासारखा नाही - या मुलाखतीत राज ठाकरेंनी त्यांचे मोठे भाऊ उद्धव ठाकरेंबद्दल त्यांचे परखड मत मांडले. राज ठाकरे म्हणाले, 'ती व्यक्ती काही बोलते आणि काहीतरी करते. तो विश्वासार्ह व्यक्ती नाही. मला संपूर्ण देशापेक्षा जास्त माहिती आहे आणि महाराष्ट्राला त्याच्याबद्दल माहिती नाही. राज ठाकरे म्हणाले, सत्तेसाठी तुम्ही काहीही करा. कोणाशीही जाणार आणि पक्ष अडचणीत आला तर बाळासाहेबांचे नाव घेऊन सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करणार. पक्षाचा विस्तार करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. कोणा पुढे जायचे नाही? त्यात काही गैर नाही. असे म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. दरम्यान, राज ठाकरे यांनी केलेल्या उद्धव ठाकरे यांच्यावरच्या गंभीर आरोपांवर अद्याप शिवसेनेकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. यावर आता शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

हेही वाचा : Raj Thackeray :आज बाळासाहेब असते तर?.. राज ठाकरे यांनी स्पष्टच सांगितलं

Last Updated : Jul 24, 2022, 12:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.