ETV Bharat / city

Sanjay Raut : संजय राऊतांना जामिन दिल्यास साक्षीदारांना धमकवण्याची शक्याता; ई़डीचा न्यायालयात युक्तिवाद

author img

By

Published : Aug 8, 2022, 9:40 PM IST

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत ( Shiv Sena MP Sanjay Raut ) यांना 22 ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी ( 14 days judicial custody to Sanjay Raut ) सुनावण्यात आली आहे. गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळ्याप्रकारांना संजय राऊत यांना 1ऑगस्ट रोजी अटक ( Sanjay Raut was arrested on August 1 ) केली होती. त्यानंतर त्यांना दोन वेळा ईडी कस्टडी देण्यात आली होती आज कस्टडी संपल्यानंतर न्यायालयासमोर हजर केले असता ईडीच्या ( ED ) अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची कस्टडीची मागणी केली नसल्याने 22 ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन ( Raut judicial custody till August 22 ) कोठडीत पाठवण्यात आले आहे.

Etv BharatSanjay Raut
संजय राऊत t

मुंबई- शिवसेना खासदार संजय राऊत ( Shiv Sena MP Sanjay Raut ) यांना आज मुंबई सत्र न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी रवानगी ( 14 days judicial custody to Sanjay Raut ) केली आहे गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळ्याप्रकारांना संजय राऊत यांना 1ऑगस्ट ( Sanjay Raut was arrested on August 1 ) रोजी अटक केली होती. त्यानंतर त्यांना दोन वेळा ईडी कस्टडी देण्यात आली होती आज कस्टडी संपल्यानंतर न्यायालयासमोर हजर केले असता ईडीच्या ( ED ) अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची कस्टडीची मागणी केली नसल्याने 22 ऑगस्ट ( Raut judicial custody till August 22 ) पर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.

संजय राऊत

शिवसेना झुकणार नाही - संजय राऊत यांना 1 वाजल्याच्या जवळपास ईडी अधिकारी कोर्टामध्ये घेऊन दाखल झाले होते. त्यावेळी संजय राऊत यांच्या अंगावर शिवसेनेचा नाव असलेला भगवा मफलर त्यांच्या खांद्यावर होते. मात्र, ज्यावेळी कोर्टाच्या गेटवर राऊत पोहचले त्यावेळी त्यांनी तेव्हा मोफलर गळ्यावरून काढून हातामध्ये ठेवला होता. मागील सुनावणी दरम्यान देखील संजय राऊत यांनी हाच मकलर गळ्यामध्ये घालून कोर्ट रूममध्ये दाखल झाले होते. नंतर लक्षात आल्यानंतर त्यांनी मफलर काढून हातामध्ये ठेवला होता. संजय राऊत यांना पोलीस अधिकारी आर्थर रोड जेलमध्ये घेऊन जात असताना मोठ्या प्रमाणात शिवसैनिक सत्र न्यायालयाच्या परिसरामध्ये जमलेले होते. त्यावेळी संजय राऊत यांना पत्रकारांनी विचारले असता शिवसेना झुकणार नाही असे, म्हणत गाडीमधून समोर निघून गेले. संजय राऊत यांना घरचे जेवण आणि औषधी देण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयाने आज जेल प्रशासनाला दिले आहे तसेच राहू त्यांच्याकडून बेड उपलब्ध करून देण्याचे मागणी केली होती. मात्र न्यायालयाने ती फेटाळून लावत कारागृहामध्ये असलेल्या बेड करून देण्याचे निर्देश कारागृह प्रशासनाला दिले आहे.



प्रवीण राऊत हे संजय राऊतांना दर महिन्याला दोन लाख देत होते? पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणात अटकेत असलेले संजय राऊतांना 31 जुलैला रात्री उशिरा भांडुपच्या घरातून ताब्यात घेऊन अटक केली होती. या प्रकरणी ईडीने असा दावा केला होता की, संजय राऊत यांचा संबंध असून प्रवीण राऊत यांच्या माध्यमातून संजय राऊत यांनी पैसा मिळवला. प्रवीण राऊत फक्त मोहरा होते. खरे सूत्रधार संजय राऊत हेच होते. आमच्याकडे याचे पुरावे आहेत. तसेच राऊतांनी दोन साक्षीदारांना धमकावल्याचं ईडीच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं. संजय राऊत यांना जर जामीन मिळाला तर, ते पुन्हा धमकाविण्याचं किंवा त्यापुढे जाऊन कृत्य करु शकतात. तसेच राऊत यांचे परदेश दौरे बिझनेसमन, विविध लोकांकडून पुरस्कृत केले जातात. याचं नेमकं कारण काय? असा सवाल करत प्रवीण राऊत हे संजय राऊतांना दर महिन्याला दोन लाख देत होते ते कशासाठी? असा सवालही ईडीने उपस्थित केला आहे.



संजय राऊत यांच्यावर ईडीने कोणते आरोप केले? संजय राऊत यांचा पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचा थेट हात असल्याचा आरोप ईडीने केला. त्यांचे भाऊ प्रविण राऊत पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होते. त्यांना HDIL ग्रुपकडून 112 कोटी रुपये मिळाले. त्यातील 1 कोटी 6 लाख 44 हजार रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले. अलिबाग येथे याच पैशातून जमीन खरेदी करण्यात आली. राऊत परिवाराला पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा झाला आहे. या प्रकरणात ज्यांचं नाव सुरुवातीला समोर आलं होतं आणि ज्यांच्यावर कारवाई झाली होती. ते प्रविण राऊत हे नावालाच होते या प्रकरणातील खरे आरोपी संजय राऊत असल्याचा दावा ईडीने केला. संजय राऊत हेच प्रविण राऊत यांना समोर करून सर्व व्यवहार करत होते. असं ईडीने न्यायालयात सांगितलं. मग पत्राचाळ गैरव्यवहारातील पैसे असो की दादर येथील घर आणि अलिबाग येथील जमीन सर्व व्यवहार संजय राऊत यांच्या सांगण्यावरूनच करण्यात आले. येस बँक घोटाळा प्रकरणी वाधवान बंधू यांच्यासोबत प्रविण राऊत यांचं नाव आलं असून या प्रकरणीही संजय राऊत यांची भविष्यात ईडीकडून चौकशी केली जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.




हेही वाचा - Maharashtra Assembly Session : बुधवारपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन

काय आहे पत्राचाळ घोटाळा? मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा म्हाडा भूखंड आहे. पत्राचाळ जमीन घोटाळा 1,034 कोटी रुपयांचा आहे. पत्राचाळमध्ये राहणाऱ्या 672 भाडेकरूंना सदनिका देण्याची योजना सरकारने आखली. तेव्हा हा घोटाळा सुरू झाला. ही चाळ विकसित करण्याचे कत्रांट महाराष्ट्र गृहनिर्माण व विकास प्राधिकरणाने प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन या कंपनीला दिले होते. गुरु आशिष कंपनी चाळीतील भाडेकरूंना 672 सदनिका देऊन 3 हजार फ्लॅट एमएचडीएला देणार होती. हे फ्लॅट 47 एकर जागेवर बांधले जाणार होते. मात्र गुरु आशिष कन्स्ट्रक्शनने तसे केले नाही. कंपनीने चाळीतील लोकांसाठी फ्लॅट बांधले नाहीत किंवा एमएचडीएला फ्लॅटही दिला नाही. कंपनीने ही जमीन अन्य आठ बिल्डरांना 1,034 कोटी रुपयांना विकली. हे दोन्ही घोटाळे करणाऱ्या एचडीआयएलचे संचालक प्रवीण राऊत, सारंग वाधवान, राकेश वाधवन आहेत.

वर्षा यांना 83 लाखांचे कर्ज - ईडीने प्रवीणला पकडले तेव्हा संजय राऊतचे नाव समोर आले. प्रवीण हा शिवसेना खासदार संजय राऊत यांचा मित्र आहे. प्रवीणच्या पत्नीने संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना 83 लाखांचे कर्जही दिले होते. ज्याचा वापर राऊत कुटुंबाने दादरमध्ये फ्लॅट घेण्यासाठी केला होता. तपास सुरू झाल्यावर वर्षा यांनी प्रवीणच्या पत्नीला 55 लाख रुपये परत केले. या प्रकरणातील आणखी एक आरोपी सुजित पाटकर याचाही संजय राऊतशी संबंध आहे. सुजित हा संजय यांच्या मुलीच्या फर्ममध्ये भागीदार आहे. सुजितची पत्नी, संजय राऊत यांच्या पत्नीने मिळून अलिबागमध्ये जमीन खरेदी केली होती. ही जमीनही घोटाळ्याच्या पैशातून घेण्यात आली होती.





हेही वाचा - Uddhav Thackeray : भविष्यात शिवसेनेच्या नादी लागण्याची कोणाची हिंमत...; उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.