ETV Bharat / city

Nitin Gadkari Meet With Raj Thackeray : नितीन गडकरीनी घेतली राज ठाकरेंची सदिच्छा, नेमकी सदिच्छा कोणती ते मात्र गुलदस्त्यात

author img

By

Published : Apr 3, 2022, 10:32 PM IST

Updated : Apr 4, 2022, 8:00 AM IST

केंद्रीय मंत्री भाजप नेते नितीन गडकरी राज ठाकरे ( Nitin Gadkari Meet With Raj Thackeray ) यांच्या भेटीला त्यांच्या शिवतीर्थावर गेले होते. गडकरी आणि राज ठाकरे यांच्यात मनसेच्या बदललेल्या भूमिकेवरून चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र ही सदिच्छा भेट असल्याचे गडकरी यांनी भेटीनंतर प्रसारमाध्यमांना सांगितले.

नितीन गडकरी राज ठाकरेंच्या भेटीला
नितीन गडकरी राज ठाकरेंच्या भेटीला

मुंबई - केंद्रीय मंत्री भाजप नेते नितीन गडकरी राज ठाकरे ( Nitin Gadkari Meet With Raj Thackeray ) यांच्या भेटीला त्यांच्या शिवतीर्थावर गेले. गडकरी आणि राज ठाकरे यांच्यात मनसेच्या बदललेल्या भूमिकेवरून चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यातील आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युती संदर्भात चर्चा झाली का हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही.

राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास दोन तास चर्चा झाली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भेट झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ही भेट सदिच्छा भेट असल्याचं केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी सांगितले. गेल्या अनेक वर्षापासून राज ठाकरे आणि आपल्या कुटुंबाचे सलोख्याचे संबंध आहेत. तसेच राज ठाकरे यांनी मुंबईतील नवीन घरी येण्याचे आमंत्रण दिले होते. त्यामुळे आमंत्रणाचा स्वीकार करून आपण राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतल्याचं गडकरी यांनी सांगितले.

नवीन युतीची नांदी ? - 2 एप्रिलला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या झालेल्या मेळाव्यात आपल्या भाषणातून राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीवर तोफ डागली. खासकरून शिवसेना आणि उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या रडारवर होते. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी राज ठाकरे यांची घेतलेली भेट ही नवीन राजकीय युतीची नांदी असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेऊन शिवसेनेला धक्का देण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले जात आहे. शिवसेनेशी युती तुटल्यानंतर मनसे आणि भाजप युतीसाठी प्रयत्न केले गेले होते. काही कारणास्तव ही युती होऊ शकली नव्हती. मात्र नितीन गडकरी आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर युतीच्या चर्चा पुन्हा रंगू लागल्या आहेत.

Last Updated : Apr 4, 2022, 8:00 AM IST

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.