ETV Bharat / city

उडता पंजाब,  प्रमाणे 'उडता महाराष्ट्र' करण्याचा प्रयत्न; नवाब मलिकांचे समीर वानखेडेवर आरोप

author img

By

Published : Nov 7, 2021, 12:21 PM IST

Updated : Nov 7, 2021, 2:04 PM IST

आजच्या पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. उडता पंजाब नंतर उडता महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न सुरु होता, असे नवाब मलिक म्हणाले. समीर वानखेडे आणि त्यांच्या प्रायव्हेट आर्मीने मुंबईत 'पाताळलोक' सुरु केले आहे. असा गंभीर आरोप मलिक यांनी केला आहे.

ड्रग्ज प्रकरणात आर्यनला अडकवून खंडणी वसुलीचे स्वप्न;  नवाब मलिकांचे समीर वानखेडेवर आरोप
Nawab Malik says Aryan Khan's a kidnap and ransom case, Sameer Wankhede & Mohit Kamboj partners

मुंबई - महाराष्ट्रात ड्रग्सचे मोठे रॅकेट सुरू आहे. या रॅकेटमधून अनेक लोकांना फसवले जातेय. फसवणूक झालेल्या लोकांकडून मोठ्या प्रमाणात खंडणी उकळली जातेय. चांडाळ चौकडीच्या माध्यमातून हे सर्व ट्रक रॅकेट सुरू असून एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे, अधिकारी वि के सिंग, आशिष रंजन आणि समीर वानखेडे यांचा ड्रायव्हर माने हे सर्व मिळून लोकांना ड्रग्सच्या खोट्या आरोपाखाली अडकवायचे आणि त्यानंतर या चांडाळचौकडी त्यांच्याकडून पैसे उकळायचे, असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी आपल्या पत्रकार परिषदेत केला आहे.

नवाब मलिकांचे समीर वानखेडेवर आरोप

कार्डेलिया क्रूज पार्टीमध्ये अस्लम शेख यांना आमंत्रण -

ज्या कार्डेलिया क्रूज पार्टी प्रकरणांमध्ये शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती. याच पार्टीमध्ये मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनाही आमंत्रित करण्यात आला असल्याचा धक्कादायक खुलासा नवाब मलिक यांनी केला. या पार्टीचा आयोजक काशिफ खान यांनी अनेक वेळा असलम शेख यांना फोन करून पार्टीमध्ये येण्याचा आग्रह धरला होता. मात्र या पार्टीला अस्लम शेख गेले नाही. जर असलम शेख चुकून या पार्टीला गेले असते तर, त्यांनाही या प्रकरणात गोवल गेलं असतं. आणि ज्याप्रमाणे पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्स पसरला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही ड्रग्सचा विळखा बसला, असं दाखवण्याचा प्रयत्न केला गेला असता. ज्याप्रमाणे उडता पंजाब म्हटलं जातं. त्याचप्रमाणे उडता महाराष्ट्र करण्याचं कट-कारस्थान या पार्टीच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. त्यामुळे त्या सर्व प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी आम्ही केली असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

हॉटेल ललितमध्ये वानखडे यांच्या प्रायव्हेट आर्मीच्या बैठका -

मुंबईमध्ये असलेल्या हॉटेल ललितमध्ये अद्रक प्रकरणाबाबतच्या अनेक बैठका होत होत्या. या हॉटेलमध्ये सुनील पाटीलच्या नावाने सात महिने रूम बुक करण्यात आलेली होती. या रूममध्ये आणि हॉटेलमध्ये समीर वानखेडे यांच्या प्रायव्हेट आर्मीच्या बैठका होत होत्या. तसेच या प्रायव्हेट आर्मी सोबत मुंबईचे काही पत्रकार देखील सामील असल्याचा नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले. तसेच सुनील पाटील हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता नाही. याआधी सुनील पाटील बरोबर आपली कोणतीही भेट किंवा चर्चा झालेली नाही. मात्र ज्या वेळेस क्रूज प्रकरण समोर आलं, त्यानंतर सुनील पाटील यांनी फोनवर संपर्क साधून या प्रकरणांमध्ये असलेलं सत्य आपल्याला सांगणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र त्यानंतर ही सुनील पाटील यांच्यासोबत आपली भेट झाली नसल्याचं नवाब मलिक यांनी आपल्या पत्रकार परिषदेतून सांगितले.

मोहित भारतीयांच्या सांगण्यावरून तिघांना सोडले -

कार्डिलिया क्रूज प्रकरणांमध्ये त्या रात्री 11 जणांना पकडण्यात आलं होतं. मात्र, समीर वानखेडे यांनी केवळ 8 जणांची नाव समीर वानखेडे यांनी समोर आणली. यानंतर भाजपाचे नेते मोहित भारतीय यांच्या मेहुण्या सोबत अजून दोन जणांना सोडण्यात असल्याची बाब आम्ही समोर आणल्यानंतर 11 नव्हे तर 14 लोकांना त्यावेळी ताब्यात घेण्यात आले असल्याचे एनसीबी ने सांगितले असं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं.

समीर वानखेडे आणि मोहित भारतीय यांचे रॅकेट

एनसीबी चे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि भारतीय जनता पक्षाचे नेते मोहित भारतीय हे एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखतात. बॉलिवूडच्या सेलिब्रिटींना खोट्या केसमध्ये अडकवून त्यांच्याकडून खंडणी उकळण्याचा रॅकेट या दोघांच्यात माध्यमातून चालतं. मुंबई शहरात एकूण बारा हॉटेल मोहित भारतीय यांचे आहेत. तसेच आपल्या हॉटेल शेजारी असलेल्या इतर हॉटेल मालकांना समीर वानखेडे यांच्या माध्यमातून खोट्या ड्रग्स केसेसमध्ये अडकवण्याचे काम केलं जात असल्याचा आरोप आपल्या पत्रकार परिषदेतून नवाब मलिक यांनी केला.

पत्रकार परिषदेमध्ये काय म्हणाले नवाब मलिक?

  • शहरात वानखडे ड्रग्ज धंदा व्यवस्थित चालवण्यासाठी काम करतात
  • सॅम डिसुजा, सॅनियल डिसुजा आरोप करायला पुढे येतात.
  • अकराशे कोटींच्या भ्रष्टाचार करणारी व्यक्ती भाजपची. दिंडोशीमध्ये निवडणुकीला उभी होती.
  • प्रतीक गाभा आणि आमिर फर्निचरवाला आर्यनला घेऊन गेले.
  • मोहित कंबोजच्या मार्फत अपहरणाचा प्लॅन होता.
  • हे सगळं प्रकरण अपहरणासाठी होत.
  • 18 कोटी मध्ये डील झाली होती. पण एका सेल्फी मुळे सगळे अडकले.
  • मोहित शहरात 12 हॉटेल चालवतो. समीर वानखडे त्याचा चांगला मित्र
  • आम्ही बऱ्याच जणांना आत घेऊन जातानाचे व्हिडिओ दाखवले
  • मोहित भरती यांच्या मेव्हण्याला सोडण्यात आलं होत.
  • सॅम डिसुजा हा सॅनियल डिसुजा आहे.
  • सॅमच्या गुगलपे वरून सचिन पाटीलच्या पत्नीला गुगलपे केल्याचं समोर आलंय.
  • हॉटले ललितमध्ये अनेक गुपीत लपली आहेत.
  • मनीष भानुशाली, धवल भानुशाली, सॅम डिसुझा कशी अय्याशी करायचे, त्या हॉटेलात ते मी समोर आणेल, म्हणून काल कँबोजला पत्रकार परिषद घेण्यासाठी सांगितले गेले.
  • सुनील पाटीलला मी कधीच भेटलो नाही, तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नाही.
  • सुनील पाटील वानखडेचा प्रयव्हेट आर्मीचा आहे , फ्रजी आहे.
  • राजीव बजाज आणि ऍड प्रदीप नामबीयर हे फर्जी पत्रकार वानखडेचे प्रावेट आर्मी आहेत.
  • मी एनसीबीशी लढत नाही आहे. मी भाजप सोबतही लढत नाही.
  • या शहरात ड्रग्सच्या नावाने हजारो कोटींची लूट होतेय
Last Updated : Nov 7, 2021, 2:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.