ETV Bharat / city

Mansukh Hiren Murder Case : मुंबई सत्र न्यायालयाने आरोपी विनायक शिंदेचा जामीन फेटाळला

author img

By

Published : Mar 23, 2022, 7:41 PM IST

अँटिलिया स्फोटक तथा मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी ( Mansukh Hiren Murder Case ) माजी पोलीस अधिकारी विनायक शिंदे अटकेत आहे. विनायक शिंदेने जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, हा अर्ज न्यायालयाने फेटाळला ( Session Court Bail Reject Vinayak Shinde ) आहे.

Court
Court

मुंबई - मुंबई सत्र न्यायालयाने माजी पोलीस अधिकारी विनायक शिंदेचा जामीन फेटाळला ( Session Court Bail Reject Vinayak Shinde ) आहे. अँटिलिया स्फोटक तथा मनसुख हिरेन संशयास्पद मृत्यू प्रकरणात ( Mansukh Hiren Murder Case ) विनायक शिंदेला महाराष्ट्र एटीएसने अटक केली होती. अटक केल्यापासून विनायक शिंदे तळोजा कारागृहात आहे. या प्रकरणात अद्याप एकाही आरोपीला जामीन मिळालेला नाही.

21 मार्च 2021 रोजी माजी पोलीस अधिकारी विनायक शिंदेला एसटीएसने अटक केली होती. त्यानंतर हे प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे वर्ग केले होते. अटकेनंतर विनायक शिंदेच्या घरात एटीएसने झाडाझडती घेतली. विनायक शिंदे हा सचिन वाझेचा कलेक्टर होता, असे म्हटले जात असे. विनायक शिंदेने जामीनासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, मंगळवारी न्यायालयाने हा जामीन अर्ज फेटाळला आहे.

कोण आहे विनायक शिंदे?

2006 साली झालेल्या लखनभैया बनवाट चकमक प्रकरणात प्रमुख आरोपी प्रदिप सुर्यवंशी याच्यासह विनायक शिंदेही दोषी आढळला होता. पोलीस हवालदार असणाऱ्या शिंदेला त्यानंतर निलंबीत करण्यात आले होते. वाझे, सुर्यवंशी व शिंदे या तिघांनीही एकत्रित काम केले आहे. शिंदे हा मे 2020 पासून जामीनावर बाहेर होता.

आतापर्यंत किती जणांना अटक?

1. सचिन वाझे

2. विनायक शिंदे

3. रियाझ काझी

4. सुनील माने

5. नरेश गोर

6. संतोष शेलार

7. आनंद जाधव

8. प्रदीप शर्मा

हेही वाचा - Kirit Somaiya On Uddhav Thackeray : '...तर उद्धव ठाकरेंची झोप उडेल'; किरीट सोमैयांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.