मुंबई - मुंबईमध्ये 'डी आर आय'द्वारे एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये (293.81) किलोग्राम अफगाणी हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. या अमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत दोन हजार करोड रुपये इतकी किंमत असल्याची माहिती समोर आली आहे. 'डी आर आय' मुंबईकडून देण्यात आलेल्या माहितीद्वारे, अफगाणिस्तानमधून पंजाबमधील एका कंपनीत अफगाण दगडांची आयात केली गेली. हे दगड कंटेनरमधून आणण्यात आले होते. या कंटेनरमध्ये हिरॉईनचे मोठ-मोठे डबे लपवण्यात आले होते
12 जुलैपर्यंत कोठडी
'ए एन आय' या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ज्या कंपनीने दगड आयात केले होते. त्या कंपनीच्या मालकाला 'डी आर आय'च्या अमृतसर विभागाने अटक केली आहे. या कंपनीच्या मालकाचे नाव प्रभजीत सिंह असे आहे. या व्यक्तीला मुंबईत आणण्यात आले. त्यानंतर त्याला पनवेल कोर्टात हजर केले असता त्याला 12 जुलैपर्यंत 'डी आर आय' कोठडीत पाठवण्यात आले आहे.