ETV Bharat / city

Maharashtra Monsoon Updates : पावसाला सुरुवात.. बळीराजा सुखावला.. तीन दिवस पावसाची शक्यता

author img

By

Published : Jun 14, 2022, 7:08 AM IST

Updated : Jun 14, 2022, 12:53 PM IST

राज्यात दाखल झाल्यानंतर आता मॉन्सूनने जोरदार बरसण्यास सुरुवात केली आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाळा सुरुवात झाली असून, त्यामुळे बळीराजा नक्कीच सुखावणार आहे. अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर मॉन्सूनचे महाराष्ट्रात आगमन झाले आहे. मॉन्सूनने जवळपास पूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. १२ जून ते १७ जून दरम्यान 5 दिवसांसाठी IMD ने मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा इशारा दिला होता . त्यानुसार पाऊस पडत (Maharashtra Monsoon Updates ) आहे.

Maharashtra Monsoon Updates
महाराष्ट्र मान्सून अपडेट्स

मुंबई : हवामान विभागाने पाच दिवस राज्याच्या अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राज्यात बरसत आहे. सुरुवातीस तळकोकणात असलेल्या मॉन्सूनने आता जवळपास संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. आगामी तीन दिवस राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता (Maharashtra Monsoon Updates ) आहे.

राज्यात १०१ टक्के पावसाचा अंदाज - भारतीय हवामानशास्त्र विभागाने नुकतेच मॉन्सूनच्या दुसऱ्या टप्प्याचा अंदाज जाहीर केला असून, त्यामध्ये देशात यंदा १०३ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. जूनमध्ये राज्याच्या दक्षिण कोकण, मुंबई तसेच पश्चिम विदर्भाच्या काही जिल्ह्यांत कमी पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यात १०१ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

मान्सून
मान्सून

मुंबईत मॉन्सून स्थिरावला : मुंबईत शुक्रवारी (दि. 10 जून) रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आहे. शनिवारी मुंबईत पाऊस ( Rain in Mumbai ) दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. गेल्या 24 तासात मुंबई शहर विभागात सर्वाधिक तर पूर्व उपनगरात सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

  • Current spell of intense rainfall likely to continue over Northeast India and Sub-Himalayan West Bengal & Sikkim during next 5 days. pic.twitter.com/QUSiZmQ98f

    — India Meteorological Department (@Indiametdept) June 13, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'या' भागात आगामी पाच दिवस पावसाची शक्यता : आगामी पाच दिवस राज्याच्या अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मॉन्सून महाराष्ट्रात दाखल झाला असून, सुरुवातीस तळकोकणात असलेल्या मॉन्सूनने आता अर्धा महाराष्ट्र व्यापला आहे. मुंबईसह कोकणातील बहुतांश भागात, मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकातील आणखी काही भागांमध्ये मॉन्सून दाखल झाला ( Maharashtra Monsoon Updates ) आहे. मॉन्सून राज्यात दाखल झाल्याने राज्यात येत्या 5 दिवसांसाठी मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात पावसाची तीव्रता ही जास्त असण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने वर्तविली आहे.

राज्यात १०१ टक्के पावसाचा अंदाज : भारतीय हवामानशास्त्र विभागाने नुकतेच मॉन्सूनच्या दुसऱ्या टप्प्याचा अंदाज जाहीर केला असून, त्यामध्ये देशात यंदा १०३ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. जूनमध्ये राज्याच्या दक्षिण कोकण, मुंबई तसेच पश्चिम विदर्भाच्या काही जिल्ह्यांत कमी पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यात १०१ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

हेही वाचा : मुंबईत गेल्या 24 तासांत शहरात सर्वाधिक पावसाची नोंद, वाहतूक सुरळीत

Last Updated : Jun 14, 2022, 12:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.