ETV Bharat / city

BREAKING : पंजाबमध्ये राजकीय भुकंप... कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

author img

By

Published : Sep 18, 2021, 7:24 AM IST

Updated : Sep 18, 2021, 5:02 PM IST

maharashtra
breaking news

17:00 September 18

पंजाबमध्ये राजकीय भुकंप... कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

नवी दिल्ली - काँग्रेसचे वरिष्ठ नेते नवज्योतसिंग सिद्धू आणि पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यातील वादाला मोठे वळण लागले आहे. काँग्रेसचे हायकमांडने मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे. त्यानंतर मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी राज्यपालांची भेट घेत राजीनामा दिला आहे.

16:34 September 18

भाजप खासदार बाबूल सुप्रियो यांनी सोडली कमळाची साथ, 'तृणमूल'मध्ये प्रवेश

नवी दिल्ली - भाजप खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो यांनी ममता बनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस (टीएमसी)मध्ये प्रवेश केला आहे. टीएमसीचे राष्ट्रीय महासचिव आणि लोकसभा खासदार अभिषेक बनर्जी आणि राज्यसभा खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी बाबुल सुप्रियो यांना पक्षाचं सदस्यत्व दिलं आणि स्वागत केलं.  आसनसोल लोकसभा मतदारसंघाचे खासदार असलेल्या सुप्रियो यांच्या तृणमूल प्रवेशानं पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. 

14:51 September 18

अभिनेता सोनू सूदच्या अडचणी वाढणार, 20 कोटींच्या टॅक्स चोरीचा आरोप

मुंबई - बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.  आयकर विभागाने सोनू सूदवर 20 कोटींचा टॅक्स चोरीचा आरोप करत त्याच्या चॅरिटी ट्रस्टद्वारे विदेशी निधी अधिनियम अॅक्ट नियमांचे उल्लंघन केल्याचाही आरोप आहे. या प्रकरणी आता सोनू सूदची चौकशी ईडी, सीबीआयसह गृहमंत्रालयाच्या एफसीआरए डिव्हिजन देखील करणार असल्याची शक्यता आहे.  

13:12 September 18

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची शक्यता

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी जर त्यांना मुख्यमंत्री पदावरून हटवले तर ते पक्षाचा राजीनामा देतील, असे म्हटले असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात येत आहे. पक्षाच्या वरिष्ठांकडून कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याकडे राजीनाम्याची मागणी केली जाण्याची शक्यता आहे. ज्यामुळे अमरिंदर सिंग देखील मोठा निर्णय घेऊ शकतात. 

13:09 September 18

आधार कार्ड पॅनकार्डला लिंक करण्याची मुदत मार्च 2022 पर्यंत वाढवली

केंद्राने आधार कार्ड पॅनकार्डला लिंक करण्यासाठीची मुदत सहा महिन्यांनी वाढवली आहे. 30 सप्टेंबर पर्यंत असलेली ही मुदत आता मार्च 2022 वाढविण्यात आली आहे. 

13:01 September 18

रविवार पासून पुढील तीन दिवस महाराष्ट्रात गडगडाटी वादळासह पावसाची शक्यता - आयएमडी

IMD, ने दिलेल्या पूर्वानुमाना व इशाऱ्या नुसार राज्यात १९ सप्टेंबर-रविवार पासून पुढचे ३ दिवस काही ठिकाणी गडगडाटासहित जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काही भागात याचा प्रभाव असेल.

10:49 September 18

कांजूरमार्गमध्ये अल्पवयीन मुलीवर वॉचमनचा अत्याचार

मुंबईतील कांजूरमार्गमधील एका सोसायटीच्या वॉचमनने 11 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना  समोर आली आहे. त्याच्याविरोधात पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित आरोपी वॉचमनला शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली असून आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 

07:14 September 18

आयएनएस शिवाजी परिसरात ड्रोन उडवल्याप्रकरणी एकास अटक

लोणावळ्यात नौदलाच्या आयएनएस शिवाजी या संस्थेच्या परिसरात ड्रोन उडवल्या प्रकरणी एका 35 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. परवानगी न घेता त्याने या परिसरात हे ड्रोन उडवले होते.

07:09 September 18

ठाण्यातून एका अमली पदार्थ तस्कराला 11 लाखाच्या केटामाईनसह अटक, 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने 31 वर्षीय अमली पदार्थ तस्काराला 11.12 लाख रुपयांच्या केटामाईन या अमलीपदार्थासह आनंदनगर परिसरातून अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने 20 सप्टेबर पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

07:06 September 18

दिल्ली मुंबई महामार्ग नरिमन पॉईंट पर्यंत वाढवण्याचा विचार- गडकरी

आम्ही दिल्ली-मुंबई हा जगातील सर्वात जास्त लांबीचा महामार्ग तयार करत आहोत. तो महामार्ग मुंबईतील जवाहर नेहरू बंदरापर्यंत करण्यात येणार होता. मात्र आता आम्ही तो मार्ग नरिमन पॉईंट पर्यंत नेण्याच्या विचार करत असून त्या संदर्भात महाराष्ट्र सरकारसोबत चर्चा करत आहोत, अशी माहिती केंद्रीय दळण वळण मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

06:54 September 18

दिल्ली दहशतवादी अटक प्रकरणात मुंबईतून आणखी एकाला उचलले

दिल्ली पोलिसांनी सहा जणांना अटक करून दहशतवाद्यांच्या मोठा डाव उधळला. त्या प्रकरणाशी संबंधित आणखी एका जणास जोगेश्वरी येथून ताब्यात घेण्यात आले आहे. महाराष्ट्र एटीएस आणि मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा पथकाने संयुक्तरित्या कारवाई करत शुक्रवारी त्याला ताब्यात घेतले आहे.

Last Updated : Sep 18, 2021, 5:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.