ETV Bharat / city

जागतिक महिला दिनीच मिस इंडियाचा अपमान.. भेटवस्तू म्हणून दिले रद्दीचे कागद

author img

By

Published : Mar 8, 2021, 8:57 PM IST

Updated : Mar 8, 2021, 9:11 PM IST

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशीच मिस इंडिया असलेल्या तरुणीचा अपमान झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबई काँग्रेसच्या महिला अध्यक्षा अजंता यादव यांच्यावर मिस इंडिया स्पर्धेतील द्वितीय विजेती मान्या सिंग हिचा अपमान केल्याचा आरोप मान्याचे वडील ओम प्रकाश सिंह यांनी केले आहेत.

Miss India on International Women
Miss India on International Women

मुंबई - आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशीच मिस इंडिया असलेल्या तरुणीचा अपमान झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबई काँग्रेसच्या महिला अध्यक्षा अजंता यादव यांच्यावर मिस इंडिया स्पर्धेतील द्वितीय विजेती मान्या सिंग हिचा अपमान केल्याचा आरोप मान्याचे वडील ओम प्रकाश सिंह यांनी केले आहेत.

मान्या सिंग यांचे वडील ओम प्रकाश सिंग यांनी एक व्हिडिओ बनवून सांगितले आहे की, रविवारी सकाळी साडेदहा वाजता अजंता यादव या मुंबई काँग्रेसच्या महिला अध्यक्षा आहेत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत मान्यासिंग यांच्या घरी कांदिवली पूर्व येथील ठाकूर व्हिलेज येथे भेट घेण्यासाठी पोहोचले होते.

जागतिक महिला दिनीच मिस इंडियाचा अपमान

हे ही वाचा - राज्याचा अर्थसंकल्प निराशाजनक; केंद्राच्याच योजनांचा अर्थसंकल्पात समावेश -फडणवीस


या भेटीदरम्यान त्यांनी त्यांना एक भेटवस्तू दिली. यादव गेल्यानंतर त्यांनी जेव्हा ती भेटवस्तू उघडली तर त्यात त्यांना केवळ रद्दीचे कागद मिळाले.

त्यानंतर मान्याचे वडील ओम प्रकाश सिंग यांनी अंजता यादव यांना फोन केला होता. त्यांनी फोनवर कबुलीनामा दिला की, वेळ न भेटल्यामुळे आणि गिफ्ट मोठे दिसता यावे यासाठी त्याच्यात कागदाचे तुकडे भरण्यात आले होते.

त्यासोबत मान्याच्या वडिलांनी असे सुद्धा सांगितले की, येत्या काळात काँग्रेस पक्षातर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमा दरम्यान त्यांना भेटवस्तू देण्यात येईल.

Last Updated : Mar 8, 2021, 9:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.