ETV Bharat / city

India corona Update : कोरोना रुग्णसंख्येत घट, २४ तासात १९,६७३ रुग्ण

author img

By

Published : Jul 31, 2022, 12:25 PM IST

मुंबईत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत वाढ झाली ( Mumbai corona update ) होती. जूननंतर रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागली आहे. आज २८६ रुग्णांची तर १ मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या १७८ बेडवर रुग्ण असल्याची माहिती ( Maharashtra corona update ) पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट

मुंबई- देशातील कोरोना रुग्णसंख्येत काहीअंशी घसरण झाली ( India corona update ) आहे. २४ तासात आढळणाऱ्या रुग्णांची संख्या २० हजारांहून कमी झाली आहे. देशात २४ तासांत १९,६७३ रुग्ण आढळले ( New corona cases in India ) आहेत.

मुंबईत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत वाढ झाली ( Mumbai corona update ) होती. जूननंतर रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागली आहे. आज २८६ रुग्णांची तर १ मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या १७८ बेडवर रुग्ण असल्याची माहिती ( Maharashtra corona update ) पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

२८६ नवे रुग्ण - मुंबईत गेल्या २४ तासात ८ हजार ०६१ चाचण्या करण्यात आल्या. त्यात २८६ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. आज १ मृत्यूंची नोंद झाली आहे. २६५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख २४ हजार ४९१ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११ लाख ३ हजार ०२५ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ६४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १ हजार ८१७ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ३११६ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०२२ टक्के इतका आहे.

कोविड जम्बो केंद्रे होणार बंद- कोरोना रुग्णांवर उपचार करता यावेत यासाठी मुंबईत ८ ठिकाणी 'कोविड जम्बो केंद्रे' सुरू केली आहेच. यामधून लाखो रुग्णांवर उपचार केले गेले. मात्र, आता रुग्णांची संख्या कमी झाल्याने ही केंद्र टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जंबो सेंटर बंद होणार असली तरी पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू राहणार आहेत असाही निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा-Chess Olympiad 2022 : भारत 'ब' संघाने एस्टोनियाचा 4-0 ने केला पराभव

हेही वाचा-Rush On Delhi Liquor Shop : दिल्लीत दारूच्या दुकानांवर मद्यशौकीनांची प्रचंड गर्दी

हेही वाचा-Banded Racer Snake In Found : राजस्थानात दुर्मिळ प्रजातीचा बँडेड रेसर साप आढळला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.