ETV Bharat / city

Home Minister About Fadnavis Interrogation : 'देवेंद्र फडणवीस यांना आरोपी म्हणून नोटीस नाही पाठवली' - गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

author img

By

Published : Mar 14, 2022, 2:34 PM IST

माजी मुख्यमंत्री व विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Leader of Opposition Devendra Fadnavis Interrogation ) यांची त्यांच्या सागर या निवासस्थानी दोन तास मुंबई सायबर सेल पोलिसांनी कसून चौकशी केली. या चौकशीला भाजपकडून विरोध करण्यात येत होता व हा मुद्दा आज विधानसभेमध्ये गाजणार यामध्ये कुठलेही दुमत नव्हते. परंतु या मुद्द्यावर आज विधानसभेमध्ये भाजप नेते आक्रमक झाले असताना यास उत्तर देताना गृहमंत्री वळसे पाटील यांनी ( Home Minister About Fadnavis Interrogation ) म्हणाले.

Home Minister About Fadnavis Interrogation
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

मुंबई - काल मुंबई सायबर सेल पोलिसांनी माजी मुख्यमंत्री व विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Leader of Opposition Devendra Fadnavis Interrogation ) यांची त्यांच्या सागर या निवासस्थानी दोन तास कसून चौकशी केली. या चौकशीला भाजपकडून विरोध करण्यात येत होता व हा मुद्दा आज विधानसभेमध्ये गाजणार यामध्ये कुठलेही दुमत नव्हते. परंतु या मुद्द्यावर आज विधानसभेमध्ये भाजप नेते आक्रमक झाले असताना यास उत्तर देताना गृहमंत्री वळसे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना आरोपी म्हणून नोटीस पाठवली नसून याबाबत माहिती घेण्यासाठी त्यांची चौकशी केली गेली, असे सांगून या वादावर पडदा ( Home Minister About Fadnavis Interrogation ) टाकला आहे.

काय म्हणाले गृहमंत्री -

या प्रकरणावर बोलताना गृहमंत्री म्हणाले, की या प्रकरणांमध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. २४ लोकांचे जबाब घेतले गेले आहेत. सीआरपीसी ॲक्ट 160 प्रमाणे तपास अधिकाऱ्यांना कुठली माहिती हवी असल्यास ते मागू शकतात. देवेंद्र फडवणीस यांना या अगोदरही नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. पण ते कामांमध्ये कदाचित व्यस्त असल्याकारणाने त्याला उत्तर देऊ शकले नाहीत. याबाबत त्यांना कुठले प्रश्न विचारण्यात आले व त्यांनी काय उत्तर दिली हे मला माहीत नाही. परंतु चौकशी याबाबत चालू आहे की गुप्तचर विभागाचा डेटा बाहेर कसा आला. केंद्रीय गृह सचिव यांना पत्र पाठवून तो पेन ड्राईव्ह पोलिसांनी मागवला आहे. आपल्याकडे काय माहिती आहे हेच त्यांना विचारण्यात आले होते. हा रुटीन चा भाग असून देवेंद्र फडवणीस हे आरोपी म्हणून त्यांना नोटीस पाठवली नाही. जाणीपूर्वक त्यांना अडचणीत आणण्याचा शासनाचा कुठलाही मानस नाही आहे. त्या कारणास्तव हा विषय इथेच थांबवावा अशी विनंतीही त्यांनी सभागृहातील भाजप नेत्यांना केली.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिलेल्या उत्तरानंतर यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या प्रश्नावर मी पोलिसांना सांगितले होते की मी उत्तर देणार आहे. परंतु, या अगोदर मला पाठवण्यात आलेल्या प्रश्नावलीतले प्रश्न व कालचे प्रश्न यात गुणात्मक फरक आहे. तुम्ही ऑफिशियल सिक्रेट ॲक्टचा भंग केला आहे का? असे वाटत नाही का? अशा पद्धतीचा प्रश्न म्हणजे मला साक्षीदार म्हणून विचारण्यात आलेला प्रश्न नसून मला यामध्ये गोवण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु विजल ब्लोअर ॲक्ट प्रमाणे मी पूर्ण सुरक्षित असून मला काही चिंता नाही. यामध्ये ट्रान्सक्रिपट आहेत पण त्या मी केंद्रीय गृहसचिव यांना दिल्या. मला विचारण्यात आलेले प्रश्न कुठे बदलले गेले हे मला माहीत नसून यापूर्वी माझ्या वडिलांना दोन वर्ष व माझ्या काकूंना अठरा महिने विनाकारण जेलमध्ये ठेवण्यात आलेले आहे. परंतु असे असले तरी सुद्धा अशा प्रकारच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर आम्ही लढतच राहणार असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही वाचा - Chemistry question paper leak : बारावीचा पेपर फुटला नसल्याचा शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचा दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.