ETV Bharat / city

Gutkha Seized : साडेदहा लाखांचा गुटखा पकडला; कोपरखैरणे पोलिसांची धडक कारवाई

author img

By

Published : Oct 17, 2022, 6:46 PM IST

गेल्या चार महिन्यात कोपरखैरणे पोलिसांनी (Mumbai police action on Gutkha Mafiya) ही धडक कारवाई केली आहे. 19 जुलैला रात्री अकरा वाजता कोपरी गावातील पवार चाळीतील रूम 205 मधून 9 लाख 55 हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला असून अज्ञात आरोपी फरार आहे. (Latest news from Mumbai) (Mumbai Crime)

Gutkha Seized
Gutkha Seized

नवी मुंबई : मानवी आरोग्यास अपायकारक असलेला तब्बल साडेदहा लाख रु. किमतीचा गुटखा तसेच सुगंधित सुपारी जप्त (Gutkha Seized In Mumbai) करण्यात आली आहे. गेल्या चार महिन्यात कोपरखैरणे पोलिसांनी (Mumbai police action on Gutkha Mafiya) ही धडक कारवाई केली आहे. 19 जुलैला रात्री अकरा वाजता कोपरी गावातील पवार चाळीतील रूम 205 मधून 9 लाख 55 हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला असून अज्ञात आरोपी फरार आहे. (Latest news from Mumbai) (Mumbai Crime)

गुटखा जप्तीच्या कारवाईबाबत सांगताना पोलीस अधिकारी

आरोपींना अटक - कोपरखैरणे बोनकोडे गावामधील पित्रुछाया निवास या सोसायटीतील घर क्रमांक 46/1 इथे 3 ऑगस्टला पोलिसी कारवाई दरम्यान 60 हजार सहाशे रु. किमतीचा गुटखा पकडण्यात आला. ही पोलिसी कारवाई 3 ऑगस्टला करण्यात आली. आरोपी मुमताज अहमद नफीज अहमद (वय 34 वर्षे) असे आरोपी महिलेचे नाव असून तिला अटक करण्यात आली आहे. तिच्यावर भादंवि कलम 328 आणि 273 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 13 ऑक्टोबरला कोपरखैरणे सेक्टर 23 मधून 64 हजार रु. किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी आझाद प्रताप श्रीकांत यादव (वय 19 वर्षे) यालाही अटक करण्यात आली आहे. यादववर भादंवि कलम 436, 328, 272, 273 आणि 188 अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले.

बेकायदेशीर विक्रीसाठी गुटख्याची साठवणूक- महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला व मानवी आरोग्यास अपायकारक , मानवी जिवितास धोका दुखापत करणाऱ्या गुटख्याची बेकायदेशीर विक्री करण्याच्या उद्देशाने हा गुटखा साठवला असल्याची खात्रिशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे कोपरखैरणे पोलिसांनी ही कारवाई केली असल्याची माहिती परिमंडळ 1चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.