ETV Bharat / city

Financial Literacy In BMC Schools : मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये देणार आर्थिक साक्षरतेचे धडे, शेअर मार्केटची सफर : मंत्री आदित्य ठाकरे

author img

By

Published : Feb 10, 2022, 3:40 PM IST

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये आगामी काळात विद्यार्थ्यांना आर्थिक साक्षरतेचे धडे देण्यात येणार ( Financial Literacy In BMC Schools ) आहेत. विद्यार्थ्यांना शेअर मार्केटची सफरही घडविण्यात ( Tourism Walk In BSE ) येईल, अशी माहिती मंत्री आदित्य ठाकरे ( Tourism Minister Aaditya Thackeray ) यांनी दिली.

आदित्य ठाकरे
ठाकरे यांनी आज शेअर बाजारच्या अधिकाऱ्यांसोबत यासंदर्भात बैठक घेतली.

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आर्थिक साक्षरतेचे धडे देण्यात येणार ( Financial Literacy In BMC Schools ) आहेत. आर्थिक साक्षरता वाढण्यासाठी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज ( शेअर बाजार )ची सफर घडविण्यात ( Tourism Walk In BSE ) येईल. यासंदर्भात शेअर बाजाराच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरु असल्याची माहिती पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे ( Tourism Minister Aaditya Thackeray ) यांनी दिली. ठाकरे यांनी आज शेअर बाजारच्या अधिकाऱ्यांसोबत यासंदर्भात बैठक घेतली.

  • We’ve decided to work on financial literacy in BMC schools & have mobile financial literacy vans to go to schools in Maharashtra. Planning on BSE tourism walks with BSE administration for tourists to get an insight into its value for India: Maharashtra Minister Aaditya Thackeray pic.twitter.com/1UX2ea6Yib

    — ANI (@ANI) February 10, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आर्थिक साक्षरतेची राज्यातील शाळांत जाणार मोबाईल व्हॅन्स

राज्यभरातील विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण व्हावी यासाठी राज्यभरातील शाळांमध्ये आर्थिक साक्षरता मोबाईल व्हॅन्स ( Financial Literacy Mobile Vans ) पाठविण्यात येणार आहेत. तसेच शेअर बाजारच्या परिसरात 'टुरिझम वॉक' आयोजित करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. टुरिझम वॉकमुळे पर्यटकांना शेअर बाजाराची भारतासाठी असलेली किंमत समजेल, असेही ते म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.