ETV Bharat / city

Eknath Shinde Oath Ceremony Live Updates : एकनाथ शिंदे सरकारचे पहिले विधानसभेचे विशेष अधिवेशन 2 आणि 3 जुलै रोजी

author img

By

Published : Jun 30, 2022, 7:06 PM IST

Updated : Jun 30, 2022, 11:09 PM IST

Eknath Shinde Oath Ceremony Live Updates
एकनाथ शिंदे

22:59 June 30

एकनाथ शिंदे सरकारचे पहिले विधानसभेचे विशेष अधिवेशन 2 आणि 3 जुलै रोजी

  • Maharashtra cabinet has decided to call special session of State Assembly for 2 days - on 2nd and 3rd July. On the first day of the session, Speaker elections will be completed. Speaker's post is vacant since Nana Patole's resignation.

    — ANI (@ANI) June 30, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मुंबई - महाराष्ट्र मंत्रिमंडळाने 2 आणि 3 जुलै रोजी 2 दिवसांसाठी राज्य विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभापती निवडी पूर्ण होणार आहेत. नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर सभापतीपद रिक्त आहे.

21:40 June 30

उद्धव ठाकरे यांनी दिल्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना शुभेच्छा, म्हणाले...

  • महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री @mieknathshinde जी व उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांना भावी वाटचालीस शुभेच्छा. आपल्या हातून महाराष्ट्रामध्ये चांगले काम होवो, ही सदिच्छा!

    — Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) June 30, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भावी वाटचालीस शुभेच्छा. आपल्या हातून महाराष्ट्रामध्ये चांगले काम होवो, ही सदिच्छा!' असे ट्वीटकरुन उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

20:41 June 30

'देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ आनंदाने घेतली नाही'

संघाच्या संस्कारमुळे देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री शपथ घेतली असावी, त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ आनंदाने घेतली नाही, असे त्यांच्या चेहऱ्यावरुन दिसत होते असे शरद पवारांनी सांगितले.

20:35 June 30

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्या कॅबिनेट मंत्रीमंडळाची बैठकीला सुरुवात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्या कॅबिनेट मंत्रीमंडळाची बैठकीला सुरुवात झाली आहे.

20:31 June 30

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शरद पवारांनी दिल्या शुभेच्छा

एकनाथ शिंदे यांना शरद पवार यांनी अंतकारणापासून शुभेच्छा दिल्या.

19:39 June 30

देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली

देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली

19:36 June 30

एकनाथ शिंदे यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

एकनाथ शिंदे यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

19:22 June 30

एकनाथ शिंदे राजभवनात दाखल, थोड्याच वेळात घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

एकनाथ शिंदे यांचे राजभवनात आगमन झाले आहे. थोड्याच वेळात त्यांचा मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा संपन्न होईल.

19:17 June 30

देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता

  • Devendra Fadnavis has decided to join the Maharashtra government on the request of BJP chief JP Nadda, tweets Union Home minister Amit Shah pic.twitter.com/kRJoAr4vgq

    — ANI (@ANI) June 30, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

गृहमंत्री अमित शहा आणि जे. पी. नड्डा यांच्या आदेशानंतर आता देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

18:52 June 30

Eknath Shinde Oath Ceremony Live Updates : एकनाथ शिंदे होणार महाराष्टाचे नवे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांनी केली घोषणा

मुंबई - देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे मुंख्यमंत्री होणार असल्याचे घोषित केले. तसेच आपण शिंदे गटाला बाहेरुन पाठिंबा देणार आहेत. आघाडी सरकारमध्ये कामे होत नव्हती. बाळासाहेबांचे विचार योग्य पद्धतीने पुढे घेऊन जाता येत नव्हते. आमदारांना योग्य प्रमाणात निधी दिला जात नव्हता. शिवसेना आमदारांकडून हारलेल्या आमदारांना मोठ्या प्रमाणात स्थान दिल्या जात होते. असे आरोप आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याची एकनाथ शिंदे यांनी केले. देवेंद्र फडणवीस स्वत: मंत्रिमंडळात सहभागी होणार नाहीत. भाजप एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा देणार आहे. ( Eknath Shinde allegations on shiv sena )

सायंकाळी 7 वाजता घेणार शपथ - शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी राजीनामा दिला आहे. बहुमत चाचणीला सामोरे जाण्यापूर्वीच उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आहे. महाराष्ट्रात मोठे सत्ता नाट्य घडून आहे. एकनाथ शिंदे हे गोव्यातून मुंबईत दाखल झाले. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राज्यपालांची राजभवनावर भेट घेतली. व सरकार स्थापनेचा दावा केला. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे आज सायंकाळी 7 वाजता मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत, अशी माहिती दिली.

एकनाथ शिंदे यांचे पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे -

फडणवीसांनी मनाचा मोठेपणा दाखवला - भाजपाकडे मोठ्या प्रमाणात संख्याबळ असतानाही देवेंद्र फडणवीसांनी मनाचा मोठेपणा दाखवला, आणि बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदाची संधी दिली. आम्ही फडणवीसांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही असे एकनाथ शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील. त्यांनी राज्यपालांकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा केला आहे, त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी हे सांगितले.

फडणवीसांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही - पुढे एकनाथ शिंदे म्हणाले की, "या संबंधी भाजपने आम्हाला साथ दिली, संख्याबळानुसार त्यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा न लावता बाळासाहेबांच्या विचाराने चालणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्रीपद दिले. हा देवेंद्र फडणवीस यांच्या मनाचा मोठेपणा आहे. देवेंद्र फडणवीस आमच्या पाठिशी आहे. ते मंत्रिमंडळात नसले तरी ते राज्याच्या विकासासाठी आमच्यासोबत आहेत. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. "

एकनाथ शिंदे यांचे आरोप - "राज्याचा विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकास हा अजेंडा म्हणून आम्ही पुढे निघालो आहोत. एक वैचारिक भूमिका घेऊन आम्ही जात आहोत. गेल्या काही काळांमध्ये आम्ही उद्धव ठाकरेंना आमच्या मतदारसंघातील अडचणींची माहिती दिली, त्यामध्ये सुधारणा व्हावी अशी मागणी केली. पुढच्या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवणे याचाही विचार आम्ही केला. राज्याच्या हिताच्या दृष्टीने अनेक गोष्टी होत्या, महाविकास आघाडीमध्ये त्यावर निर्णय घेता येत नव्हते. पक्षाचे 50 आमदार ज्यावेळी वेगळी भूमिका घेतात, त्याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज होती." बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची भूमिका घेऊन 50 आमदारानी वेगळी भूमिका घेतली, त्यांना मी धन्यवाद देतो. त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याला तडा जाऊ देणार नाही. हे सरकार लोकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यास कटीबद्ध आहे असे एकनाथ शिंदे म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांची केली घोषणा - भाजपने निर्णय घेतलाय की, आम्ही सत्तेच्या पाठिमागे नाही आहोत. कुठल्यातरी मुख्यमंत्रीपदाकरता आम्ही काम करत नाहीयत. ही तत्त्वांची लढाई आहे. ही हिंदुत्वाची लढाई आहे. ही विचारांची लढाई आहे. म्हणून भाजपने निर्णय घेतलाय की, एकनाथ शिंदे यांना भाजप समर्थन देईल आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील. त्यामुळे आज संध्याकाळी साडेसात वाजता एकनाथ शिंदे यांचा एकट्याचा शपथविधी होईल. लवकरच पुढची कारवाई करुन आम्ही मंत्रिमंडळ विस्तार करु. यामध्ये शिवसेना आणि भाजपचे आमदार येतील. मी स्वत: बाहेर असेन, पण हे सरकार चाललं पाहिजे ही जबाबदारी माझी असेल", अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.

हेही वाचा - Eknath Shinde New CM : मराठी अस्मितेसह अनेक प्रश्नावर एकनाथ शिंदे ठरले भाजपसाठी ब्रम्हास्त्र

हेही वाचा - Eknath Shinde : एकनाथ शिंंदेंनी फडणवीसांचे मानले आभार तर शिवसेनेवर सोडला बाण

Last Updated : Jun 30, 2022, 11:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.