ETV Bharat / city

मुंबईत अतिवृष्टीमुळे गणपती मंडपात शिरले पाणी; कार्यकर्त्यांची धावपळ

author img

By

Published : Sep 4, 2019, 9:26 PM IST

अतिवृष्टीमुळे मुंबईतील अनेक गणेश मंडपात पाणी शिरले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी समन्वय समितीकडून काही मंडळाना काही सूचना व करण्यात आल्या आहेत.

मुसळधार पावसामुळे मुंबईतील गेणेश मंडपात शिरले पाणी

मुंबईत - शहरात मंगळवारपासून मुसळधार पाऊस पडत आहे. याचा फटका वाहतूक व्यवस्था व रस्त्यांवर दिसत आहे. गणेश उत्सवाच काळ आहे, रस्त्यांवर गणेश मंडळांचे मंडप उभारलेले आहेत. अति पावसामुळे या मंडपात पाणी शिरल्याचे चित्र मुंबईत सध्या कांदिवली पूर्वतील श्री कृष्ण मित्र मंडळ गणपती मंडपात दिसत आहे, अशा मुंबईतल्या अनेक गणपती मंडपात पाणी आल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोणताही अनुचीत घटना घडू नये यासाठी समन्वय समितीकडून काही मंडळाना काही सूचना व करण्यात आल्या आहेत.

अति पावसामुळे या मंडपात पाणी शिरल्याचे चित्र

बृह्नमुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात आले आहे. सर्व सार्वजानिक गणेशोत्सव मंडळाना कळविण्यात आले आहे. गणेशोत्सवा दरम्यान होत असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी मंडपात पाणी येण्याची शक्यता असल्यामुळे मंडपात पाणी जमा होऊ शकते. याची दक्षता म्हणून सर्व गणेशोत्सव मंडळानी मंडपातील वीजप्रवाह व्यवस्थित आहे की, नाही त्याची पाहणी करावी आणि शक्य झाल्यास पाऊस सुरू असताना वीजप्रवाह बंद ठेवावा, असे आवाहन सर्व गणेशोत्सव मंडळाना बृह्नमुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

Intro:
मुंबईत अतिवृष्टीमुळे गणपती मंडपात शिरले पाणी


मुंबईत कालपासून मुसळधार पाऊस पडत आहे .याचा फटका वाहतूक व्यवस्था व रस्त्यांवर दिसत आहे .गणेश उत्सवाचा काळ आहे आणि या काळात रस्त्यांवर गणेश मंडळांचे मंडप उभारलेले आहेत. अति पावसामुळे या मंडपात देखील पाणी शिरले याचे चित्र मुंबईत सध्या कांदिवली पूर्व श्री कृष्ण मित्र मंडळ गणपती मंडपात दिसत आहे. आशा मुंबईतल्या अनेक गणपती मंडपात पाणी आल्याचे चित्र आहे .त्यामुळे कोणतेही ही अपरिचित घटना घडू नये यासाठी समन्वय समितीकडून देखील मंडलाना काही सूचना व आव्हान करण्यात आलेले आहे.



बृह्नमुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात आले आहे की

सर्व सार्वजानिक गणेशोत्सव मंडळाना कळविण्यात येत आहे की गणेशोत्सवा दरम्यान होत असलेल्या जोरदार पाऊसामुळे अनेक ठिकाणी मंडपात पाणी येण्याची शक्यता नाकरता असल्यामुळे मंडपात पाणी जमा होऊ शकते.

ह्याचीच दक्षता म्हणून आपण सर्व गणेशोत्सव मंडळानी मंडपातील विजप्रवाह व्यवस्थित आहे की नाही त्याची पाहणी करावी आणि शक्य झाल्यास पाऊस सुरु असते वेळी विजप्रवाह बंद ठेवावे.
असे आवाहन आपणा सर्व गणेशोत्सव मंडळास बृह्नमुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.