ETV Bharat / city

अनुराग कश्यपची प्राप्तिकर विभागाकडून ११ तास चौकशी; लॅपटॉपसह कागदपत्रे जप्त

author img

By

Published : Mar 3, 2021, 10:10 PM IST

Updated : Mar 3, 2021, 10:17 PM IST

Director Anurag Kashyaps 11 hours interrogation
दिग्दर्शक अनुराग कश्यपची प्राप्तिकर विभागाकडून ११ तास चौकशी

प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्याने फिल्म फँटमसंदर्भातही काही महत्त्वाच्या कागदपत्रांच्या तपासणी केली आहे. तर अभिनेत्री तापसी पन्नुच्या घरी व कार्यालयात प्राप्तिकर विभागाचे अधिकारी तपासणीसाठी पोहोचले आहेत.

मुंबई - प्राप्तिकर विभागाने करचुकवेगिरी प्रकरणी दिग्दर्शक अनुराग कश्यपची त्यांच्या घरी ११ तास चौकशी केली आहे. या चौकशीनंतर प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्याने अनुराग कश्यपचा लॅपटॉप व बँकेसंदर्भात दस्तावेज ताब्यात घेतले आहेत. प्राप्तिकर विभागाचे अधिकारी दिग्दर्शक कश्यप यांच्या घरातून सायंकाळी ५ वाजता बाहेर पडले आहेत.

प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्याने फिल्म फँटमसंदर्भातही काही महत्त्वाच्या कागदपत्रांच्या तपासणी केली आहे. तर अभिनेत्री तापसी पन्नुच्या घरी व कार्यालयात प्राप्तिकर विभागाचे अधिकारी तपासणीसाठी पोहोचले आहेत. प्राप्तिकर विभागाला तापसीच्या घरात महत्त्वाचे कागदपत्रे मिळाली आहेत. या कागदपत्राच्या आधारावर तापसीच्या श्री या कार्यालयात कारवाई करण्यात येत आहे. प्राप्तिकर विभागाने मुंबईसहित पुण्यातील २२ ठिकाणी छापे टाकले आहेत. मात्र, या तपासणीत प्राप्तिकर विभागाच्या हाती काय लागले, हे समोर येऊ शकले नाही.

अनुराग कश्यपची प्राप्तिकर विभागाकडून ११ तास चौकशी

हेही वाचा-तापसी पन्नूचे क्रिकेट प्रशिक्षण पुन्हा झाले सुरू!


प्राप्तिकर विभागाकडून कारवाई
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फँटम फिल्म कडून मोठ्या प्रमाणात कराची चोरी करण्यात आलेला असल्याचा प्राप्तिकर विभागाला संशय आहे. मुंबईतील शास्त्री नगर जोगेश्वरी येथे फँटम फिल्मचे कार्यालय असून , गोरेगाव परिसरामध्ये अभिनेत्री तापसी पन्नूही राहत असल्याचे समोर आले आहे. या दोन्ही ठिकाणी छापेमारी करण्यात आलेली असल्याचेही प्राप्तिकर सूत्रांकडून कळत आहे.

हेही वाचा-तापसी पन्नू, अनुराग कष्यप आणि विकास बहलच्या घरावर आयकर विभागाची धाड

दिग्दर्शक अनुराग कश्यप व तापसी पन्नू या दोघांचे अभिनेत्री कंगना राणावत हिच्या सोबत शाब्दिक वाद झाले होते.

Last Updated :Mar 3, 2021, 10:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.