ETV Bharat / city

Ayodhya Visit : मनसे, शिवसेनेनंतर आता काँग्रेसची अयोध्या वारी! नाना पटोलेंना निमंत्रण!

author img

By

Published : May 10, 2022, 7:34 AM IST

राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या आयोध्या दौऱ्यावर याबाबत चर्चा सुरू असताना आता काँग्रेसला देखील आयोध्या दौऱ्याचे निमंत्रण आले आहे. त्यामुळे आयोध्या दौऱ्यावरून येणाऱ्या काळात राज्यात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नाना पटोलेंना निमंत्रण
नाना पटोलेंना निमंत्रण

मुंबई - अयोध्या दौऱ्यासाठी राज ठाकरे आणि शिवसेना यांच्यात चढाओढ सुरू असतानाच काँग्रेस पक्षाचे नेतेही आता अयोध्या दौऱ्याला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. अयोध्येतील दशरथ गादीचे प्रमुख महंत बृजमोहन दास यांनी टिळक भवन, दादर येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन त्यांना अयोध्येला येण्याचे निमंत्रण दिले. अयोध्येतील दशरथ गादीचे प्रमुख महंत बृजमोहन दास यांनी प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे 9 मे ला सायंकाळी भेट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना प्रभू श्रीरामचंद्राचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येला भेट देण्याचे निमंत्रण दिले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्या निमंत्रणाचा स्वीकार केला. मात्र या निमंत्रणाचा स्वीकार केल्यानंतर नाना पटोले आयोध्याला जाणार का, याबाबत त्यांच्याकडून कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही.

पटोले यांची भेट घेऊन त्यांना अयोध्येला येण्याचे निमंत्रण दिले
पटोले यांची भेट घेऊन त्यांना अयोध्येला येण्याचे निमंत्रण दिले

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पाच जूनला आयोध्या दौरा निश्चित करण्यात आला आहे. त्यांच्या या दौऱ्याची महाराष्ट्रभरसह आयोध्यामध्ये राजकारण सुरू झाला आहे. अयोध्येतील खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध दर्शवला आहे. तर तिथेच आदित्य ठाकरे 10 जूनला आयोध्या दौरा करतील असे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. मात्र या दोन्ही दौऱ्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि पवार कुटुंबातील सदस्य रोहित पवार यांनी 8 मे ला सहकुटुंब अयोध्येत जाऊन श्रीरामाचे दर्शन घेतलं. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या आयोध्या दौऱ्यावर याबाबत चर्चा सुरू असताना आता काँग्रेस देखील आयोध्या दौऱ्याला निघाली आहे. त्यामुळे आयोध्या दौऱ्यावरून येणाऱ्या काळात राज्यात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.