ETV Bharat / city

Mumbai Sewerage Cleaning : यंदाही मुंबईत 100 टक्के नालेसफाई होण्याची शक्यता कमीच, रवी राजा यांची प्रतिक्रिया

author img

By

Published : May 16, 2022, 10:17 PM IST

पावसाळा तोंडावर आला असतानाही ( Mumbai Sewerage Cleaning ) अजूनही नालेसफाई झालेली नाही. हे काम ३१ मे पर्यंत पूर्ण होणे आवश्यक आहे. मात्र, आतापर्यंत केवळ ३९ टक्के नालेसफाई झाली आहे. उर्वरित १५ दिवसांत नालेसफाई १०० टक्के पूर्ण होईल, असे वाटत नाही. त्यामुळे यंदाही मुंबई शहरात पाणी साचणार असल्याची भीती पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी ( Ravi Raja Tweet On Mumbai Sewerage Cleaning ) ट्विट करून व्यक्त केली आहे.

Mumbai Sewerage Cleaning
Mumbai Sewerage Cleaning

मुंबई - पावसाळा तोंडावर आला असतानाही ( Mumbai Sewerage Cleaning ) अजूनही नालेसफाई झालेली नाही. हे काम ३१ मे पर्यंत पूर्ण होणे आवश्यक आहे. मात्र, आतापर्यंत केवळ ३९ टक्के नालेसफाई झाली आहे. उर्वरित १५ दिवसांत नालेसफाई १०० टक्के पूर्ण होईल, असे वाटत नाही. त्यामुळे यंदाही मुंबई शहरात पाणी साचणार असल्याची भीती पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी ( Ravi Raja Tweet On Mumbai Sewerage Cleaning ) ट्विट करून व्यक्त केली आहे.

  • The desilting work is moving at snail speed. So far only 39% work is done and the monsoon will arrive in couple of weeks. @mybmc just to save their face sending show cause notices to contractor. But it won’t help. This year too city will face water logging due to this. 1-1

    — Ravi Raja INC (@ravirajaINC) May 16, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पालिका आयुक्तांचे नालेसफाईबाबत आदेश - मुंबई महानगरपालिकेतर्फे दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करून पावसाळ्यापूर्वीची लहान मोठ्या नाल्यातील गाळ काढला जातो. यावर्षी या कामांचे प्रस्ताव पालिका बरखास्त होईपर्यंत मंजूर झाले नव्हते. ८ मार्चला पालिका आयुक्त इकबालसिंग चहल यांची पालिका प्रशासक पदी नियुक्ती झाली. पण प्रशासकांची कर्तव्य काय आहेत, हे समजून घेण्यासाठी वेळ गेल्यामुळे नालेसफाई संदर्भातील प्रस्ताव मंजूर होण्यास उशीर झाला. २९ मार्च रोजी आयुक्तांनी प्रस्ताव मंजूर केल्यानंतर ७ एप्रिल पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. पण ३१ मे पूर्वी ७५ टक्के नालेसफाई होणे अशक्य असल्याचे आयुक्तांच्या १४ एप्रिलच्या नालेसफाई पाहणी दौऱ्यात लक्षात आल्यानंतर त्यांनी २ पाळ्यांमध्ये नालेसफाईचे काम करण्याचे आदेश संबधित अधिकाऱ्यांना दिले.

  • this work should start beginning of January every year. But every year this utmost work is delayed. This year administration has to be blamed as the @mybmc is run by administrators. Concerned department should have sensitised BMC chief in advance nd work should have started. 2-2

    — Ravi Raja INC (@ravirajaINC) May 16, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

नालेसफाईच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह - पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी नालेसफाईच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नाल्यातील गाळ काढण्याचे काम वेगाने सुरू आहे. पण आतापर्यंत केवळ ३९ टक्केच काम झाले असून दोन आठवड्यांत मान्सून दाखल होईल. प्रशासन फक्त कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस पाठवत आहे. पण तरीही ते नाल्यातील गाळ वेळेत काढणार नाही, हे त्यांच्या कामावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे यंदाही मुंबई शहरात पाणी साचणार असल्याचा दावा रवी राजा यांनी केला आहे.

हेही वाचा - Minister Smriti Irani Pune : 'काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षाला पराभूत केल्यामुळेच काँग्रेस-राष्ट्रवादीचे माझ्यावर राग'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.