ETV Bharat / city

BMC Notice To Lilavati Hospital : नवनीत राणा फोटो शूट प्रकरणी मुंबई महापालिकेची लिलावती रुग्णालयाला नोटीस

author img

By

Published : May 9, 2022, 8:13 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या खासगी घरात जाऊन हनुमान चालीसा ( Hanuman Chalisa Controversy ) पठण करू, असे आवाहन करणाऱ्या खासदार नवनीत राणा ( Navneet Rana ) यांच्यावर तुरुंगातून बाहेर आल्यावर लिलावती रुग्णालयात उपचार ( Navneet Rana Admit In Lilavati Hospital ) करण्यात आले. यावेळी रुग्णालयात काही फोटो काढण्यात आले. या प्रकरणी पालिकेने लिलावती रुग्णालयाला ( BMC Notice To Lilavati Hospital ) नर्सिंग कायद्याखाली नोटीस बजावली असून त्याचा खुलासा मागण्यात आला आहे.

BMC Notice To Lilavati Hospital
BMC Notice To Lilavati Hospital

मुंबई - मुख्यमंत्र्यांच्या खासगी घरात जाऊन हनुमान चालीसा ( Hanuman Chalisa Controversy ) पठण करू, असे आवाहन करणाऱ्या खासदार नवनीत राणा ( Navneet Rana ) यांच्यावर तुरुंगातून बाहेर आल्यावर लिलावती रुग्णालयात उपचार ( Navneet Rana Admit In Lilavati Hospital ) करण्यात आले. यावेळी रुग्णालयात काही फोटो काढण्यात आले. या प्रकरणी पालिकेने लिलावती रुग्णालयाला ( BMC Notice To Lilavati Hospital ) नर्सिंग कायद्याखाली नोटीस बजावली असून त्याचा खुलासा मागण्यात आला आहे.

फोटो शूटला शिवसेनेने आक्षेप - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या खासगी निवासस्थानी हनुमान चालीसा पठण करू, असे चॅलेंज खासदार नवनीत राणा व त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी दिले होते. त्यानंतर मुंबईत दोन दिवस राजकीय वातावरण तापले होते. याप्रकरणी शिवसेनेकडून तक्रार दाखल झाल्यावर राणा दांपत्यावर कारवाई झाली. दोघेही बारा दिवस तुरुंगात होते. त्यानंतर जामीन मिळाल्यावर नवनीत राणा या लिलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्या. मानेचा त्रास असल्याने त्यांच्यावर तिथे एमआरआय करण्यात आल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. या फोटो शूटला शिवसेनेने आक्षेप घेतला आहे.

राणा दोन दिवसात बऱ्या कशा झाल्या - एमआयआर करताना कोणताही धातू त्या कक्षात नेला जात नाही. एमआरआय करताना कोणत्याही रुग्णाचा फोटो काढला जात नाही, असे असताना नवनीत राणा यांचे फोटो कसे काढण्यात आले, असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे. राणा यांच्या प्रमाणे किती रुग्णांना अशा प्रकारे फोटो काढण्यास परवानगी देण्यात आली, राणा यांचा एमआरआय केला तर त्याचा रिपोर्ट काय आला, मानेचा त्रास असलेला रुग्ण दोन दिवसांत बरा कसा झाला, याची विचारणा आमदार मनीषा कायंदे, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.

हनुमान चालीसा प्रकरण - मुख्यमंत्र्यांच्या खासगी निवासस्थान असलेल्या 'मातोश्री' या बंगल्यावर जाऊन हनुमान चाळीसा पठण करू, असे आवाहन राणा दाम्पत्याने दिले होते. त्यानंतर मुंबईत दोन दिवस वातावरण तापले होते. या प्रकरणी राणा दाम्पत्यांला पोलिसांनी अटक केली असून ते बारा दिवस तुरुंगात होते. त्यानंतर त्यांना जामीन मिळाला आहे. जमीन मिळाल्यावर राणा दांपत्यांनी मीडियाला बाईट दिली आहे. विशेष म्हणजे कोर्टाने त्यांना मीडियाशी बोलू नये अशी अट घातली होती. कोर्टाने दिलेले अट पाळली नसल्याने राज्य सरकारने राणा दाम्पत्याचा जमीन रद्द करण्याची मागणी कोर्टाकडे केली आहे. त्यानंतर राणा यांना नोटीस पाठवून त्यांचे यावर म्हणणे मांडण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

हेही वाचा - NIA Raids In Mumbai : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या संबंधित 20 ठिकाणांवर एनआयएची छापेमारी; तिघेजण ताब्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.