ETV Bharat / city

पोलीस अन् महापालिका कर्मचाऱ्यांना धडा शिकवणार - किरीट सोमैया

author img

By

Published : Oct 19, 2021, 7:24 PM IST

किरीट सोमैया
किरीट सोमैया

दसऱ्याच्या दिवशी ठेवलेल्या रावण दहनच्या कार्यक्रमाला पोलीस व महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बेकायदेशीरपणे विरोध केला. इतकेच नाही त्यांच्यासोबत आलेल्या गुंडांनी नील सोमैया यांना धक्काबुक्की केली, असा आरोप भाजप नेते किरीट सोमैया यांनी केला आहे.

मुंबई - भाजप नेते किरीट सोमैया विरुद्ध राज्य सरकार हा सामना काही शमताना दिसत नाही. काही दिवसांपूर्वी किरीट सोमैया यांनी मुलुंड पोलिसांविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर किरीट सोमैया यांनी मुंबई महानगर पालिकेच्या कर्मचार्‍यांविरोधात नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दसऱ्याच्या दिवशी रावण दहनाचा कार्यक्रम सोमैया यांनी ठेवला होता. यास मुंबई महानगरपालिकेने विरोध केला होता. ही कारवाई करताना अधिकाऱ्यांनी काही गुंडांना हाताशी धरुन नील सोमैया यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप किरीट सोमैया यांनी केला आहे. पोलीस व पालिका कर्मचाऱ्यांना धडा शिवकणार, असा इशाराही सोमैया यांनी केला आहे.

बोलताना किरीट सोमैया

सत्ताधारी पक्षाचे दोन गुंडही होते

आदेश नसताना बेकायदेशीर कृत्य केल्याबद्दल गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्याबरोबर कारवाईसाठी आलेल्या अधिकारी आणि गुंडांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा. सत्ताधारी पक्षाचे दोन गुंडही होते, असा आरोप करत सोमैया म्हणाले, मी वेळेवर पोहोचलो नसतो तर त्यांनी माझ्या कार्यालयाचे तोडफोड केली असती. त्यामुळे मला सखोल चौकशी हवी, अशी मागणी सोमैया यांनी केली आहे.

मी ठाकरे आणि पवारांच्या गुंडगिरीला घाबरत नाही

ठाकरे सरकारने गुंडगिरी सुरू केली आहे. मी ठाकरे आणि पवारांच्या गुंडगिरीला घाबरत नाही. दसऱ्याच्या दिवशी माझ्या कार्यालयांमध्ये कारवाई करण्यासाठी आलेल्या अभियंत्याला व पोलिसांनी मी धडा शिकवणार, असा इशाराही सोमैया यांनी दिला आहे.

पोलिसांविरोधात कारवाई करण्यासाठी माझा मार्ग मोकळा

मागील महिन्यात 19 सप्टेंबरला मला बेकायदेशीरपणे सहा तास कोंडून ठेवण्यात आले होते, अशी तक्रार मी पोलिसात केली होती. मात्र, आज या तक्रारीला एक महिना पूर्ण होऊनही पोलिसांनी या तक्रारीची चौकशीही केली नाही आहे. सर्वाच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पोलिसांनी तक्रार नाकारावी किंवा एफआयआर दाखल करावा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सात दिवसाच्या आत जर पोलिसांनी कारवाई केली नाही किंवा दखल घेतली नाही तर पोलिसांविरोधात कारवाई करण्यासाठी माझा मार्ग मोकळा असल्याचे सोमैया यांनी सांगितले.

हेही वाचा - केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा रोखण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसची रणनिती, पवार-ठाकरे बैठकीत खलबते..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.