ETV Bharat / city

Harshvardhan Patil Daughter Marriage : हर्षवर्धन पाटलांची लेक अंकिता होणार ठाकरे घराण्याची सून, 'या' दिवशी होणार लग्न

author img

By

Published : Dec 8, 2021, 6:54 PM IST

बिंदुमाधव ठाकरे यांचा मुलगा निहार ठाकरे यांच्याशी भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांची लेक अंकिता पाटील यांचा विवाह ( Harshvardhan Patil Daughter Marriage ) होणार आहे. हा विवाह सोहळा 28 डिसेंबर रोजी होणार आहे. हर्षवर्धन पाटील आणि अंकिता पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नव्या निवासस्थानी म्हणजेच शिवतीर्थ इथे भेट दिली. त्यावेळी 28 तारखेला होणाऱ्या विवाह सोहळ्याचे निमंत्रण दिले आहे.

Ankita patil daughter in law of Thackeray family
हर्षवर्धन पाटलांची लेक अंकिता होणार ठाकरे घराण्याची सून

मुंबई - भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांची लेक लवकरच ठाकरे घराण्याची सून होणार असल्याची माहिती समोर आली आहे. बिंदुमाधव ठाकरे यांचा मुलगा निहार ठाकरे यांच्याशी भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांची लेक अंकिता पाटील यांचा विवाह ( Harshvardhan Patil Daughter Marriage ) होणार आहे. हा विवाह सोहळा 28 डिसेंबर रोजी होणार आहे. हर्षवर्धन पाटील आणि अंकिता पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नव्या निवासस्थानी म्हणजेच शिवतीर्थ इथे भेट दिली. त्यावेळी 28 तारखेला होणाऱ्या विवाह सोहळ्याचे निमंत्रण दिले आहे.

विवाह सोहळा मुंबईत पार पडणार -

अंकिता पाटील आणि निहार ठाकरे यांची लग्नाची तारीख जाहीर झाल्यानंतर आता निमंत्रण वाटण्यास पाटील कुटुंबीयांनी सुरुवात केली आहे. काल राज यांच्या घरी जाऊन लग्नाचे निमंत्रण देण्यात आले. यानंतर अंकिता पाटील यांनी राज ठाकरेंसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. राज ठाकरेंची मुंबईत भेट घेतली, असे कॅप्शन त्यांनी दिले आहे. मोजक्या लोकांच्या उपस्थितात हा विवाह सोहळा मुंबईत पार पडणार आहे. तर हर्षवर्धन पाटील यांचे मूळ गाव असलेल्या बावडा वासियांसाठी पाटील यांनी 17 डिसेंबरला भोजन सोहळ्याचे आयोजन केले आहे.

कोण आहेत निहार ठाकरे -

निहार ठाकरे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत. निहार यांनी एलएलएमपर्यंत शिक्षण घेतले आहे. वकिली व्यवसायात चांगला जम बसवला आहे. यांचे वडील बिंदुमाधव ठाकरे यांचे 1996 साठी एका अपघातामध्ये निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर बाळासाहेबांना मोठा धक्का बसला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जयदेव ठाकरे हे निहार यांचे सख्खे काका आहेत. तर राज ठाकरे हे चुलत काका आहे.

राजकारणात पहिले पाऊल -

हर्षवर्धन पाटील यांनी पक्षांतर केले असले तरी अंकिता पाटील आज देखील काँग्रेसमध्ये आहेत. पुण्यातील बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाची पोटनिवडणूक झाली. त्यामध्ये अंकिता पाटील यांनी विजय मिळवत राजकारणात पाऊल टाकले.

हेही वाचा - Omicron Crisis On Marriage : ओमायक्रॉनचे ऐन तोंडावर आलेल्या लग्न समारंभावर संकट, वधू-वर पक्ष धास्तीवले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.