ETV Bharat / city

Central Investigation Agency : अनिल परब यांच्या नंतर केंद्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर कोण?

author img

By

Published : May 27, 2022, 6:57 PM IST

अनिल परब यांच्यानंतर महाविकासआघाडीच्या इतर नेत्यांनाही केंद्रीय तपास यंत्रणेनेकडून चौकशीच्या फेर्‍याला समोर जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोणत्या नेत्यांवर असणार केंद्रीय तपास यंत्रणेची करडी नजर, त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.

Central Investigation Agency
केंद्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर कोण

मुंबई - अनिल परब यांची ईडीकडून चौकशी झाल्यानंतर महाविकास आघाडीचा कोणता नेता आता केंद्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर आहे, याचे तर्क-वितर्क राजकीय वर्तुळात लावली जात आहेत. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांचे नातेवाईक यांच्यासहीत त्यांच्या निकटवर्ती हे केंद्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर आहेत. तसेच अनिल परब यांच्यानंतर महाविकासआघाडीच्या इतर नेत्यांनाही केंद्रीय तपास यंत्रणेनेकडून चौकशीच्या फेर्‍याला समोर जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोणत्या नेत्यांवर असणार केंद्रीय तपास यंत्रणेची करडी नजर, त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.

केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना आणि मंत्र्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची तक्रार सातत्याने महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे. केंद्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांची यादी बरीच मोठी आहे. तरी 26 मे रोजी ईडी अधिकाऱ्यांच्या रडारवर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब होते. अनिल परब यांच्या शासकीय आणि खाजगी निवास्थान सहित त्यांच्या निकटवर्तीयांनी मिळून एकूण सात ठिकाणी ईडीकडून धाडी टाकल्या. अनिल परब यांच्यावर झालेली कारवाई ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांना संदेश देणारी होती, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

सोमैयांनी आरोप केलेल्यावर कारवाई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांनीमध्ये अनिल परब हे सर्वात आधी येतात. त्यांच्यावर झालेली कारवाई मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेला धक्का पोहोचवणारी आहे. कारण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये अत्यंत महत्त्वाचे निर्णय हे अनिल परब हेच घेत असतात. किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील महानगरपालिकेच्या बाबतीत निर्णय घेताना अनिल परब यांच्याशी चर्चा मसल्लत केल्यानंतर तो निर्णय घेतात. त्यामुळे होऊ घातलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीआधी अनिल परब यांच्यावर अटकेची कारवाई झाल्यास त्याचा मोठा फटका शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे. अनिल परब यांची 13 तास चौकशी आणि धाडसत्र झाल्यानंतर परब यांनी थेट मुख्यमंत्री यांच्या शासकीय निवासस्थानी घातले. 13 तासात घडलेल्या प्रत्येक घटनेबाबत अनिल परब यांनी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. त्यातूनच येणाऱ्या काळात शिवसेना किंवा महाविकास आघाडी वर यासारखी कारवाई पुन्हा एकदा होऊ शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अनिल देशमुख आणि नवाब मलिक सध्या अटकेत आहेत. त्यांच्यावर झालेली कारवाई ही केंद्र सरकारने सूडा पोटी केल्याचा आरोप सातत्याने महाविकासआघाडी सरकारकडून केला जात असला तरी, महाविकासआघाडी सरकार हे पूर्णता भ्रष्टाचारी सरकार असून यापुढेही अशा प्रकारच्या कारवाया त्यांच्या नेत्यांवर होतील. असा थेट आरोप भारतीय जनता पक्षाकडून करण्यात येतो. खास करून भाजपचे नेते किरीट सोमैया यांच्याकडून सातत्याने पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच त्यांचे नातेवाईक आणि इतर नेत्यांना थेट आरोप केले जातात. तसेच किरीट सोमैया यांच्याकडून ज्या मंत्र्यांवर आरोप केले आहेत, त्यांची चौकशी देखील केंद्रीय तपास यंत्रणांकडून केली जात आहे.

यशवंत जाधव - मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर देखील केंद्रीय तपास यंत्रणेची नजर आहे. यशवंत जाधव यांनी बोगस असेल कंपन्या तयार करून मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप किरीट सोमैया यांनी केला होता. त्यांच्या या आरोपानंतर आयकर विभागाकडून यशवंत जाधव यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयांवर धाडी टाकण्यात आल्या. यशवंत जाधव हे मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते. तसेच यशवंत जाधव हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्ती यांपैकी एक आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेसाठी मोठी जबाबदारी यशवंत जाधव यांच्यावर असते. आयकर विभागाने तर FEMA कायदाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना नोटीस दिली होती. त्यामुळे यशवंत जाधव यांच्यावर ही कधीही कारवाई होण्याची शक्यता आहे.

उदय सामंत - मुंबई विद्यापीठातील भूखंडाबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यावरही भाजपकडून आरोप करण्यात आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनीही अधिवेशनात मुंबई विद्यापीठाच्या भूखंड बाबतचा मुद्दा उचलून धरला होता. भूखंडाच्या निधीबाबत उदय सामंत यांच्यावर आरोप करण्यात आले होते. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर असलेल्या नेत्यांमध्ये उदय सामंत यांचाही समावेश होऊ शकतो, अशी शक्यता आता वर्तविण्यात येत आहे. भूखंड बळकावण्यासाठी उदय सामंत प्रयत्न करत असल्याचे आरोप आशिष शेलार यांनी केले आहेत. मात्र मुंबई विद्यापीठाच्या भूखंडात कोणताही गैरव्यवहार झालेला नाही. आंतरराष्ट्रीय दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्यासाठी दोन एकरचा भूखंड प्रस्तावित ठेवण्यात आला असल्याचं स्पष्टीकरण उदय सामंत यांच्याकडून देण्यात आला आहे. मात्र विद्यापीठातील भूखंडावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.

श्रीधर पाटणकर - ठाण्यातील वर्तकनगर परिसरात नीलांबरी अपार्टमेंटमध्ये सहा सनदीका जप्त करण्यात आल्या. या सनदीका खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या होते. सेल कंपनीच्या माध्यमातून घोटाळा करून या सनदी खरेदी केल्या असल्याचा ठपका ईडी काढून ठेवण्यात आला होता. ईडीकडून श्रीधर पाटणकर यांच्यावर केलेली कारवाई ही थेट मुख्यमंत्र्यांवर केली गेलेली कारवाई असल्याचे म्हंटले जातंय. किरीट सोमैया यांनी यानंतरही पोलिसांना देण्यात येणारे बुलेटप्रूफ जॅकेटमध्ये घोटाळा झाला असून संबंधित कंपनी श्रीधर पाटणकर यांचे आर्थिक व्यवहार होते. असा गंभीर आरोप केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी गैरव्यवहार केल्याचे थेट आरोप - महाविकास आघाडी सरकारमधील इतर नेत्यांसोबत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील गैरव्यवहार केल्याचा आरोप सातत्याने भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमैया यांच्याकडून करण्यात येतोय. अलिबागमध्ये जमीन खरेदी देत मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबीयांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप यांच्याकडून करण्यात आलाय. या जमीन खरेदी बाबत मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाकडे माहिती लपवली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अजित पवार - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांवर प्राप्तिकर विभागाच्या धाडी पडल्या. अजित पवार यांच्या सख्ख्या तीन बहिणींच्या संस्थांची तपासणी प्राप्तीकर विभागाकडून सहा दिवस सुरू होती. तसेच अजित पवार यांचा मोठा मुलगा पार्थ पवार यांच्याही मुंबईमधील अनंता मर्क्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर प्राप्तिकर विभागाकडून सहा दिवस तपासणी सुरू होती. जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना खरेदी प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. याबाबत खुद्द शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. अनिल परब यांच्या ईडीने केलेल्या कारवाईनंतर तपास यंत्रणा पक्षपातीपणाने काम करत असल्याचे टीका अजित पवार यांनी केली होती.

यासोबतच महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री छगन भुजबळ, मंत्री अशोक चव्हाण, आमदार प्रताप सरनाईक, माजी मंत्री एकनाथ खडसे, खासदार संजय राऊत, खासदार भावना गवळी यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले, अद्यापही हे सर्व नेते मंडळी केंद्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर आहेत. त्यामुळे आरोप झालेल्या नेत्यांची यादी मोठी असली तरी केंद्रीय तपास यंत्रणेचा फटका कोणत्या नेत्याला बसेल याविषयी आता तर्क-वितर्क लावले जात आहेत.

हेही वाचा - Anil Parab On ED Raid : 'बंद असलेल्या रिसॉर्टचे सांडपाणी समुद्रात सोडल्याच्या तक्रारीमुळे ईडीची धाड'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.