ETV Bharat / city

Monsoon Session आमच्या ओरिजिनल शिवसेनेचाच व्हीप आमदारांना लागू होणार, प्रतोद सुनील प्रभू

author img

By

Published : Aug 17, 2022, 5:12 PM IST

विधानसभेच्या दप्तरी Office of the Legislative Assembly असलेल्या नोंदीनुसार शिवसेना प्रतोद पदी माझी नेमणूक आहे. आम्ही बजावलेला सेनेच्या ५५ आमदारांना लागू होईल, असे स्पष्टीकरण शिवसेना प्रतोद सुनील प्रभू Shiv Sena Pratod Sunil Prabhu यांनी दिले. विधिमंडळात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Pratod Sunil Prabhu
प्रतोद सुनील प्रभू

मुंबई विधानसभेच्या दप्तरी Office of the Legislative Assembly असलेल्या नोंदीनुसार शिवसेना प्रतोद पदी माझी नेमणूक आहे. आम्ही बजावलेला सेनेच्या ५५ आमदारांना लागू होईल, असे स्पष्टीकरण शिवसेना प्रतोद सुनील प्रभू यांनी दिले. विधिमंडळात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज्यातील सत्ता संघर्षाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. या संदर्भातील सुनावणी २२ ऑगस्टला होणार आहे. शिवसेना आणि चिन्हाचा वाद देखील केंद्रीय निवडणूक आयोगाकडे Central Election Commission गेला आहे. विधिमंडळातील प्रतोद पदावरून ही बंडखोर शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये जुंपली आहे. हा वाद सुरू असतानाच आता शिवसेनेकडून सर्व ५५ आमदारांना पक्षादेश जारी करण्यात आला आहे. याबाबत शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू Shiv Sena Pratod Sunil Prabhu यांनी भूमिका स्पष्ट केली.

आमच्या ओरिजिनल शिवसेनेचाच व्हीप आमदारांना लागू होणार, प्रतोद सुनील प्रभू



विधानसभेच्या दप्तरी नोंद अधिवेशन काळात प्रत्येक पक्षाकडून सदस्यांना पक्षादेश बजावला जातो. त्यानुसार तो दिला आहे. संपूर्ण अधिवेशन काळात बसणे आवश्यक आहे. पुरवणी मागण्यांवर मतदान होणार आहे. त्यामुळे पूर्णवेळ सदस्यांनी उपस्थित असायला हवे, यासाठी पक्षादेश दिला आहे. विधानसभेच्या २०१९ मध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतेनुसार, परंपरेनुसार आणि नियमानुसार विधिमंडळाला दिलेल्या पत्रावर प्रतोद म्हणून माझी नियुक्ती केली असून आतापर्यंत तशी विधानसभेच्या दप्तरी नोंद आहे. त्यामुळे मी बजावलेला पक्षादेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांच्या सहित सेनेच्या प्रत्येक सदस्याला लागू होणार आहे. काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत. तर परवानगी घ्यावी लागते. आदित्य ठाकरे देखील आज उपस्थित राहून पक्षादेश पाळणार आहेत असे, सुनील प्रभू म्हणाले.

हेही वाचा Breaking भाजपच्या महत्त्वाच्या समितीत देवेंद्र फडवणीस यांचा समावेश, नितीन गडकरींना वगळले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.