ETV Bharat / city

Ravi Rana : उमेश कोल्हे हत्या प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या मविआच्या नेत्यांसह आयुक्तांची चौकशी व्हावी - आमदार रवी राणा

author img

By

Published : Jul 5, 2022, 8:50 PM IST

बडनेराचे आमदार रवी राणा आज मुंबईवरून नागपूर मार्गे थेट अमरावतीत पोहोचले. त्यांनी उमेश कोल्हे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी या प्रकरणाला लुटमारी सांगून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी केला, असा आरोप केला. व याप्रकरणी त्यांची एनआयएकडून चौकशी करावी अशी मागणी केली.

Ravi Rana
आमदार रवी राणा

अमरावती - अमरावती शहरातील औषधी विक्रेते उमेश कोल्हे यांची अतिशय निर्गुण हत्या ( Umesh kolhe Murder Case ) झाली. हे प्रकरण अतिशय गंभीर असताना देखील या प्रकरणाला लुटमारी सांगून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी केला ( Amravati police commissioner Aarti Singh ) आहे. गंभीर बाब म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांना हे प्रकरण दडपायला सांगितले असून पोलीस आयुक्तांचा मोबाईल फोन यांना एएनआयने ताब्यात घेऊन पोलीस आयुक्त आणि प्रकरण दडपण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या नेत्यांमध्ये झालेला संवाद तपासावा, अशी मागणी बडनेराचे आमदार रवी राणा यांनी केली आहे.


आमदार रवी राणा यांनी घेतली कोल्हे कुटुंबीयांची भेट - बडनेराचे आमदार रवी राणा आज मुंबईवरून नागपूर मार्गे थेट अमरावतीत पोहोचले. यावेळी त्यांनी उमेश कोल्हे यांच्या कुटुंबीयांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी आमदार रवी राणा यांनी कोल्हे कुटुंबियांकडून झाल्या प्रकाराची संपूर्ण माहिती घेतली तसेच कोल्हे कुटुंबियांचे सांत्वन केले. यानंतर आमदार रवी राणा यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

कोल्हे कुटुंबीय दहशतीत - या अतिशय गंभीर घटनेमुळे कोल्हे कुटुंबीय दहशतीत आहे. त्यांच्या घरी असणाऱ्या लहान मुलांना देखील भीती वाटते आहे. उमेश कोल्हे यांची हत्या करणारा खरा मास्तर माईंड कोण आहे, याचा शोध लागायलाच हवा. या प्रकरणाचा संबंध पाकिस्तानशी आहे का याचा छडा सुद्धा एनआयएने लावावा असे आमदार रवी राणा म्हणाले.

आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी - उमेश कोल्हे यांच्या गळ्यावर वस्तरा मारून त्यांची हत्या करण्यात आली आहे. हिंदुत्वाला मानणाऱ्या व्यक्तींमध्ये दहशत निर्माण करण्याचा हा प्रकार आहे. या प्रकरणातील आरोपींना फाशीचीच शिक्षा द्यायला हवी. यासंदर्भात मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करणार आहे. एनआयएच्या पथकासोबत देखील मी बोलणार असून हे प्रकरण दडपण्यासाठी ज्या राजकीय व्यक्तींनी दडपण आणले. त्या राजकीय व्यक्तींची देखील चौकशी करा, अशी विनंती मी एनआयएकडे करणार आहे, असे देखील आमदार रवी राणा यांनी म्हटले आहे.

नवनीत राणांनीही केला होता आरोप - मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे हत्या प्रकरणात सातही आरोपींना अटक करण्यात आली आहे. खासदार नवनीत राणांनी अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रकार केल्याचा आरोप केला होता.

हेही वाचा - Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohla : जीवन धन्य करणारा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा; जाणून घेऊया इतिहास

हेही वाचा -

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.