ETV Bharat / business

ऑक्टोबर ते डिसेंबरच्या तिमाहीत जीडीपीत ०.४ टक्क्यांची वाढ

author img

By

Published : Feb 26, 2021, 6:58 PM IST

केंद्रीय सांख्यिक आणि अंमलबजावणी संचालनालयाकडून देशाच्या जीडीपीबाबत आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. कोरोना महामारीत पहिल्यांदाच जीडीपी वाढल्याचे आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.

Indian GDP
भारतीय जीडीपी

नवी दिल्ली - सलग दोन तिमाहीत देशाच्या सकल उत्पन्नात (जीडीपी) घसरणीनंतर अर्थव्यवस्था सावरत असल्याचे स्पष्ट होत आहे. ऑक्टोबर ते डिसेंबरच्या तिमाहीत जीडीपीत ०.४ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती सरकारने दिली आहे.

केंद्रीय सांख्यिक आणि अंमलबजावणी संचालनालयाकडून देशाच्या जीडीपीबाबत आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. कोरोना महामारीत पहिल्यांदाच जीडीपी वाढल्याचे आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. मागील आर्थिक वर्षात एप्रिल ते जूनच्या तिमाहीत विकासदरात २३.०९ टक्के घसरण झाली होती. तर जुलै ते सप्टेंबरमध्ये जीडीपीत ७.५ टक्के घसरण झाली होती.

हेही वाचा-'वित्तीय क्षेत्रात विश्वासासह पारदर्शकता जपण्याला सर्वोच्च प्राधान्य'

तांत्रिकदृष्ट्या मंदी-

जर सलग दोन तिमाहीच्या विकासदरात घसण झाली तर तांत्रिकदृष्ट्या आर्थिक मंदी मानण्यात येते. पहिल्या तिमाहीनंतर दुसऱ्यातही जीडीपीत घसरण झाल्याने देशात मंदी असल्याचे स्पष्ट झाले होते. असे असले तरी गतवर्षी दिवाळी-दसरा या सणांच्या मुहूर्तावर मागणी व देशातील बाजारपेठांमध्ये विक्री वाढल्याचे दिसून आले होते.

हेही वाचा-आक्षेपार्ह ट्विट केले तर स्वयंचलितपणे अकाउंट होऊ शकते बंद

कोरोनाचा देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका

कोरोना महामारीमुळे देशात २५ मार्च २०२० ला टाळेबंदी लागू केल्यानंतर देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील अर्थव्यवस्थेची घसरण ही गेल्या चार दशकांमधील सर्वात मोठी घसरण होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २५ मार्चला देशभरात टाळेबंदी लागू केली होती. त्याचा देशातील उद्योग आणि अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. टाळेबंदी खुली केल्यानंतर अर्थव्यवस्था सावरत असल्याचा केंद्रीय अर्थमंत्रालयाने यापूर्वीच दावा केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.