ETV Bharat / business

केंद्रीय सामाईक सुविधा केंद्राच्या ६ हजार शिक्षण संस्था सुरू होणार

author img

By

Published : Jul 28, 2019, 2:35 PM IST

केंद्रीय सामाईक सुविधा केंद्र

राष्ट्रीय मुक्त शालेय शिक्षण संस्था (एआयओएस), एनआयईएलआयटी आणि इग्नूच्या अधिकृत चाचणी केंद्रावर घेण्यात येणार आहेत. केंद्रीय सामाईक सुविधा केंद्रामधून शिक्षण हे लोकांच्या घरापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

नवी दिल्ली - विद्यार्थ्यांना घरापर्यंत शिक्षणाची सुविधा देण्यासाठी केंद्रीय सामाईक सुविधा केंद्र (सीएससी) ई-गव्हर्नन्स इंडिया पुढाकार घेणार आहे. हा विभाग देशात ६ हजारांहून अधिक सीएससी शिक्षण केंद्रे येत्या तीन महिन्यात सुरू करणार आहे.

सीएससीएसकरिता शिक्षण हा पाया आहे. गटपातळीवर सहा हजारांहून अधिक शिक्षण केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. या शिक्षण केंद्रातून नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. ही माहिती सीएससी ई-गव्हर्नन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश त्यागी यांनी दिली.

राष्ट्रीय मुक्त शालेय शिक्षण संस्था (एआयओएस), एनआयईएलआयटी आणि इग्नूच्या अधिकृत चाचणी केंद्रावर घेण्यात येणार आहेत. केंद्रीय सामाईक सुविधा केंद्रामधून शिक्षण हे लोकांच्या घरापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. देशातील ३५ टक्के विद्यार्थी हे महाविद्यालयात शिक्षण घेत नाहीत. तर ६५ टक्के विद्यार्थी हे जवळ शिक्षण संस्था नसल्याने व परवडणारे फी नसल्याने शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेत नाहीत. अशा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा उद्देश्य असल्याचे त्यागी यांनी सांगितले. यापूर्वीच सीएससी ई-गव्हर्नन्सने देशात १ हजार ७० शिक्षण केंद्रे सुरू केली आहेत.

पदवी, डिप्लोमा, प्रमाणपत्राांचे अभ्यासक्रम याशिवाय स्पर्धा परीक्षांची तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत करण्यात येणार आहे. प्राध्यापक आनंद यांच्या सुपर ३० परीक्षेची मॉक टेस्ट घेण्याची परवानगी केवळ सीएससीला आहे. तसेच त्यांची पुस्तके विकण्याचे अधिकार केवळ सीएससीकडे आहेत.

सध्या, देशभरात ३.५ लाखांहून अधिक सामाईक सेवा केंद्रे आहेत.

Intro:Body:

business


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.