ETV Bharat / briefs

लंडनमधील वंशवाद आंदोलनात आत्तापर्यंत  23 पोलीस जखमी

author img

By

Published : Jun 7, 2020, 5:11 PM IST

सध्या सुरू असलेल्या कोरोना महामारीची स्थिती पाहता, संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने आंदोलनासाठी लोकांनी एकत्र येण्याचे टाळावे, असे आवाहन पोलीस अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.

लंडन पोलीस न्यूज
लंडन पोलीस न्यूज

लंडन - अमेरिकेत पोलिसांच्या कारवाईत ४६ वर्षीय कृष्णवर्णीय व्यक्ती जॉर्ज फ्लॉयड यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये आंदोलने असून काही ठिकाणी हिंसाचार होत आहे. लंडनमध्येही याविरोधात नागरिकांनी आंदोलन केले. आंदोलनावर नियंत्रण मिळवताना गेल्या काही दिवसांमध्ये 23 पोलीस जखमी झाले आहेत, असे पोलीस अधीक्षक जो. एडवर्ड्स यांनी सांगितले.

सध्या सुरू असलेल्या कोरोना महामारीची स्थिती पाहता, संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने आंदोलनासाठी लोकांनी एकत्र येण्याचे टाळावे, असे आवाहन पोलीस अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे. आम्ही लोकांची मनस्थिती समजू शकतो, कोणत्याही दुर्घटनेशिवाय आंदोलन केले जाऊ शकते. पोलीस अधिकारी अतिशय योग्य आणि संयमाने आंदोलनाला नियंत्रित करण्याचे काम करत आहेत. आंदोलकांमधील काहीजण मुद्दाम हिंसाचार घडवत आहेत. यात आमचे 23 पोलीस अधिकारी जखमी झाले असून हे चुकीचे आहे, समजून घेण्यासारखे नसल्याचे एडवर्ड यांनी पोलिसांच्या संकेतस्थळावर जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे. शनिवारी एका दिवशी 10 पोलीस जखमी झाले असून 14 लोकांना अटक करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.

जॉर्ज फ्लॉयडा यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण अमेरिकेसह लंडनमध्येही आंदोलनाची लाट उसळली आहे. पोलीस आणि प्रशासनाविरोधात तेथील नागरिक प्रचंड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. 25 मे रोजी मिनियापोलीस शहरातील पोलिसांनी जॉर्ज फ्लॉयड यांना बनावट नोटा बनवण्यावरून अटक केली होती. मात्र, एका पोलीस अधिकाऱ्याने त्यांची मान जवळपास आठ मिनिटे गुडघ्यानं दाबून ठेवली आणि त्यामुळे त्यांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला. या प्रकरणाच्या निषेधार्थ आंदोलन केले जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.