ETV Bharat / bharat

Misbehaving With Air Hostess : इंडिगो विमानात एअर होस्टेससोबत गैरवर्तन करणाऱ्या तिघांना अटक

author img

By

Published : Jan 9, 2023, 12:31 PM IST

दिल्लीहून पाटण्याला येणाऱ्या विमानात मद्यपींचे नवे कृत्य समोर आले आहे. फ्लाइटमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी एअर होस्टेस सोबत गैरवर्तन ( Misbehaving With Air Hostess ) केले. फ्लाइटच्या कॅप्टनने प्रवाशाला शांत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मद्यपींनी त्यांच्याशी हाणामारी सुरू केली. तर रात्री दहाच्या सुमारास तिघेही पाटणा विमानतळावर उतरताच त्यांना अटक करण्यात आली आहे. ( Misbehaving With Air Hostess In Indigo Flight )

Delhi to Patna flight
इंडिगो विमानात एअर होस्टेससोबत गैरवर्तन

पाटणा : दिल्लीहून पाटण्याला येणा-या इंडिगो विमानात ( Indigo Flight ) मद्यपींचा धुमाकूळ सर्वांनाच चकित करणारा होता. इंडिगो फ्लाइट 6E 6383 (Indigo Flight 6E 6383) मध्ये 3 प्रवाशांनी दारू पिऊन धिंगाणा घातला. एअर होस्टेससोबत गैरवर्तन ( Misbehaving With Air Hostess ) केले. तसेच कॅप्टनलाही मारहाण केली. दिल्लीत विमानात बसताच प्रवाशांनी गोंधळ सुरू केला. विमान कर्मचाऱ्यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. रात्री दहाच्या सुमारास तिघेही पाटणा विमानतळावर उतरताच त्यांना अटक करण्यात आली. ( Misbehaving With Air Hostess In Indigo Flight)

एक प्रवासी फरार : फ्लाइटमध्ये गोंधळ घालणारा पिंटू हा प्रवासी फरार झाला, तर नितीन कुमार आणि रोहित कुमार अशी 2 प्रवाशांची ओळख पटली आहे. ज्याला CISF ने अटक केली आहे. अटक करण्यात आलेले दोन्ही प्रवासी आधी राजकारण्यांच्या नावाने दादागिरी करत होते. तर कधी पत्रकार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होते, मात्र सीआयएसएफने त्यांंना पकडले. ( Indigo Flight At Patna Airport )


दोन्ही प्रवासी कोठून : अटक करण्यात आलेले दोन्ही प्रवासी हाजीपूर येथील रहिवासी आहेत. सीआयएसएफने दोन्ही प्रवाशांना विमानतळ पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे. विमानतळ पोलिस ठाण्याच्या अधिकार्‍यांनी ब्रेथ अ‍ॅनालायझरने त्यांची तपासणी केली असता त्यांनी दारू पिल्याचे निष्पन्न झाले. त्यांना विमानतळ पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. विमानतळावरून फरार झालेल्या पिंटू कुमारला अटक करण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. याच प्रकरणात त्याच्या नावाचा पत्ता विमान कंपनीने उपलब्ध करून दिला आहे.

फ्लाइटमध्ये घटना वाढल्या : अलीकडे फ्लाइटमध्ये अशा घटना सातत्याने पाहायला मिळत आहेत. २६ नोव्हेंबर रोजी न्यूयॉर्कहून दिल्लीला येणाऱ्या फ्लाइटमध्ये एका मद्यधुंद प्रवाशाने लघुशंका केल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील संबंधीत आरोपी शंकर मिश्रा याला बेंगळुरू येथून अटक करण्यात आली आहे. (Shankar Mishra arrested) आरोपी शंकर मिश्रा याला पोलिसांनी बेंगळुरू येथून अटक केली आहे. गेल्यावर्षी (26 नोव्हेंबर) रोजी ही घटना घडली होती. घटना समोर आल्यापासून तो फरार होता त्याचा शोध घेण्यासाठी लुकआउट नोटिसही जारी करण्यात आली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.