ETV Bharat / bharat

Weather In India : देशभरात आताच थांबणार नाही थंडीचा कहर, काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी होईल बर्फवृष्टी

author img

By

Published : Jan 29, 2022, 4:36 PM IST

शनिवारनंतर उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात थंडीची लाट ( Cold Wave In North West And Central India ) आणि थंड दिवसाची स्थिती हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे, तर वायव्य, पूर्व आणि ईशान्य भारतात 2 ते 4 फेब्रुवारी दरम्यान पाऊस ( Weather Situation Across The India ) पडेल.

देशभरात आताच थांबणार नाही थंडीचा कहर, काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी होईल बर्फवृष्टी
देशभरात आताच थांबणार नाही थंडीचा कहर, काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी होईल बर्फवृष्टी

नवी दिल्ली : शनिवारनंतर उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात थंडीची लाट ( Cold Wave In North West And Central India ) आणि थंड दिवसाची स्थिती हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. तर वायव्य, पूर्व आणि ईशान्य भारतात 2 ते 4 फेब्रुवारी दरम्यान पाऊस पडेल. भारतीय हवामान खात्याने ( Indian Meteorological Department ) सांगितले की, "उत्तर पश्चिम आणि मध्य भारतातील बहुतांश भागात पुढील २४ तासांत किमान तापमानात कोणताही लक्षणीय बदल होण्याची शक्यता नाही. त्यानंतर हळूहळू 4-6 अंश सेल्सिअसने तापमानात वाढ होईल ( Weather Situation Across The India ) ."

वायव्य आणि मध्य भारतातील बहुतांश भागात २ फेब्रुवारीपर्यंत कमाल तापमान ३-५ अंश सेल्सिअसने वाढण्याची आणि त्यानंतर घसरण्याची शक्यता आहे. पुढील चार दिवसांत पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये पृष्ठभागावर वारे (15- 25 किमी प्रतितास) वाहण्याची शक्यता आहे. पुढील 3 दिवसांत पूर्व भारतात किमान तापमानात कोणताही लक्षणीय बदल होण्याची शक्यता नाही आणि त्यानंतर ते 2-4 अंश सेल्सिअसने घसरेल. त्याचप्रमाणे, पुढील दोन दिवसांत गुजरातमध्ये किमान तापमानात कोणताही लक्षणीय बदल होण्याची शक्यता नाही आणि त्यानंतर 2-4 अंश सेल्सिअसने तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

पुढील २४ तासांत पंजाब, हरियाणा-चंदीगड, पश्चिम उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये काही ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर ती कमी होईल. तर उत्तर प्रदेश आणि पूर्व राजस्थानमध्ये काही ठिकाणी थंडीचे दिवस येण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर ते कमी होतील. पुढील २४ तासांत मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये काही ठिकाणी थंडीची तीव्र स्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे आणि त्यानंतर ती हळूहळू कमी होईल. तर मध्य प्रदेश आणि ओडिशामध्ये पुढील दोन दिवसांत आणि विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये काही ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर ती हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे.

आयएमडीने म्हटले आहे की, 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी रोजी उप-हिमालयीन क्षेत्र असलेल्या पश्चिम बंगाल, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये विखुरलेला, हलका - मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुढील २४ तासांत, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये तुरळक ठिकाणी गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. पुढील चार दिवसांत तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ आणि माहे येथे काही ठिकाणी आणि पुढील ४८ तासांत आंध्र प्रदेश आणि यानम येथे किनारपट्टी भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. 2 ते 4 फेब्रुवारी दरम्यान पश्चिम हिमालयीन प्रदेशात व्यापक हलका/ मध्यम पाऊस/ बर्फवृष्टी होण्याची दाट शक्यता आहे. 3 फेब्रुवारी रोजी, जम्मू, काश्मीर, गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद आणि हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस/ बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.

2 ते 4 फेब्रुवारी दरम्यान पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये हलका/मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. 3 आणि 4 फेब्रुवारी रोजी बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम आणि 4 आणि 5 फेब्रुवारी रोजी आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा येथे पश्चिमेकडील वारे आणि पूर्वेकडील वारे यांच्या संगमामुळे, मध्यम गारांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.