ETV Bharat / bharat

Kejriwal On 'The Kashmir Files'...तर 'द कश्मीर फाईल्स युट्युबर टाका; केजरीवाल यांचे भाषण व्हायरल

author img

By

Published : Mar 25, 2022, 9:32 AM IST

देशाच्या पंतप्रधानांना जर विवेक अग्निहोत्रीच्या पायाशी लोळण घ्यावी लागत असेल तर गेल्या 8 वर्षात त्यांनी काहीही काम केलेले नाही. (The Kashmir Files Cinema) अशी टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. दरम्यान, भाजप शासित राज्यांत 'द कश्मीर फाइल्स चित्रपट टॅक्स फ्री करण्यापेक्षा तो युट्युबवर टाका, सगळा देश पाहील असा टोलाही त्यांनी लगावला आहे. ते विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान बोलत होते.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

नवी दिल्ली - 'द कश्मीर फाइल्स' हा चित्रपट काही भाजपशासित राज्यात करमुक्त करण्यात आलाय. दिल्लीतही भाजपकडून 'द कश्मीर फाइल्स' करमुक्त करण्याची मागणी करण्यात आली. (Kejriwal On Vivek Agnihotri ) त्यावरुन विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान बोलताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीं जोरदार निशाणा साधला आहे. (The Kashmir Files Cinema ) देशाच्या पंतप्रधानांना जर विवेक अग्निहोत्रीच्या पायाशी लोळण घ्यावी लागत असेल तर गेल्या 8 वर्षात त्यांनी काहीही काम केलेले नाही अशी टीका त्यांनी केली आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दिधानसभेत बोलताना

पंडितांच्या नावावर कुणीतरी कोट्यवधींची कमाई करत आहे - काश्मीर फाइल्स चित्रपट तुम्ही टॅक्स फ्री करण्याची मागणी का करत आहात? तुम्हाला एवढेच जर वाटत असेल तर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींना सांगा, ते चित्रपट यूट्यूबवर टाकतील. मग सर्व लोकांना फुकट पाहता येईल. (Kejriwal demanded Upload The Kashmir Files YouTube) करमुक्त करण्याची गरजच काय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, काश्मिरी पंडितांच्या नावावर कुणीतरी कोट्यवधींची कमाई करत आहे आणि भाजपावाल्यांना त्यांनी चित्रपटाचे पोस्टर लावण्याचे काम दिले आहे, असा टोलाही केजरीवालांनी यावेळी लगावला आहे.

जनतेच्या भल्यासाठीचे काम देऊ - अरविंद केजरीवाल यांनी यावेळी भाजप आमदारांना 'आप'मध्ये सामील होण्याचे आवाहन केले. 'तुम्ही आमच्यासोबत या. (Kejriwal On The Kashmir Files) आम्ही तुम्हाला 'द काश्मीर फाइल्स'सारख्या 'खोट्या' चित्रपटांचे पोस्टर लावण्याचे काम देणार नाही. आम्ही तुम्हाला चित्रपटाचे प्रमोशन करायला लावणार नाही. चांगले काम देऊ, जनतेच्या भल्यासाठीचे काम देऊ, अस केजरीवाल यावेळी म्हणाले आहेत.

हेही वाचा - योगी आदित्यनाथ घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ! कार्यक्रमाला 'हे' मान्यवर लावणार हजेरी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.