ETV Bharat / bharat

रणजीत सिंह खून प्रकरण: बाबा राम रहीमला सीबीआयच्या विशेष न्यायालयाकडून जन्मठेपेची शिक्षा

author img

By

Published : Oct 18, 2021, 4:55 PM IST

Updated : Oct 18, 2021, 5:16 PM IST

रोहतकच्या तुरुंगामधून बाबा राम रहीमची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजेरी झाली. यापूर्वी बाबा रहीमला दोन महिला साध्वीवरील बलात्कार प्रकरणी ऑगस्ट २०१७ मध्ये त्याला २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. या दोन्ही प्रकरणात रहीम हा रोहतक येथील सुनारिया तुरुंगात शिक्षा भोगत आहे.

रणजीत सिंह खून प्रकरण
रणजीत सिंह खून प्रकरण

चंदीगड - सीबीआयच्या विशेष न्यायालयाने बाबा राम रहीमसहित पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. रणजीत सिंह यांच्या खुनाच्या प्रकरणात पंचकुलाच्या विशेष न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने राम रहीमला 31 लाखांचा दंड ठोठावला आहे. तर इतर आरोपींना 50 हजारांचा दंड ठोठावला आहे.

रोहतकमधील तुरुंगामधून राम रहीमला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमधून न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तर इतर चार आरोपींना पंचकुला येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. यापूर्वीच सीबीआयच्या विशेष न्यायालयाने रणजीत हत्याकांडात पाच आरोपींना दोषी ठरविले आहे. या प्रकरणात 12 ऑक्टोबरला शिक्षा सुनावण्यात येणार होती. मात्र, बचाव पक्षाने निकालपत्रक न वाचल्याने 12 ऑक्टोबरची सुनावणी टळली होती. सोमवारच्या सुनावणीत सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा-Kerala Flood : पावसाचा कहर; आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू, पंतप्रधानांकडून पूरस्थितीचा आढावा

पंचकुला जिल्ह्यात जमावबंदी लागू

रामा रहीमसह पाच जणांना शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर जिल्ह्यात तणावाची स्थिती होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन पंचकुला पोलीस उपायुक्त मोहित हांडा यांनी जिल्ह्यात जमावबंदी लागू केली आहे. सेक्टर 1,2,5,6 आणि संबंधित क्षेत्रात पाच आणि त्याहून अधिक लोक जमण्यास मनाई करण्यात आली आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास कलम 188 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त हांडा यांनी सांगितले. रणजीत सिंह हत्याकांडात राम रहीला दोषी ठरविल्यानंतर पोलीस, सीआयडी, आयबीसहित सर्व तपास संस्था पंचकुलामधील स्थितीवर नजर ठेवून आहेत. पोलिसांकडून सीसीटीव्हीद्वारा तपासणी केली जात आहे.

हेही वाचा-चीनला रोखणार भारताचे त्रिशूल आणि वज्रस्त्र

या गुन्ह्यात आरोपींना शिक्षा

रणजीत सिंह हत्याकांडात डेराचे प्रमुख गुरमीत रहीम सिंह आणि कृष्ण कुमारला न्यायालयाने खून आणि कट रचण्याच्या गुन्ह्यात दोषी ठरविले आहे. तर जसवील आणि सबदिल यांना खून, कट रचणे आणि शस्त्र बाळगणे या गुन्ह्यात न्यायालयाने दोषी ठरविले आहे.

हेही वाचा-गोवा विधानसभेचे दोन दिवशीय अधिवेशन आजपासून सुरू.. सावंत सरकारचे शेवटचे अधिवेशन वादळी ठरणार

या गुन्ह्यांत बाबा रहीम आहे तुरुंगात कैद

रोहतकच्या तुरुंगामधून बाबा राम रहीमची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजेरी झाली. यापूर्वी बाबा रहीमला दोन महिला साध्वीवरील बलात्कार प्रकरणी ऑगस्ट २०१७ मध्ये त्याला २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. या दोन्ही प्रकरणात रहीम हा रोहतक येथील सुनारिया तुरुंगात शिक्षा भोगत आहे. तसेच पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्याप्रकरणी दोषी ठरलेल्या गुरमीत राम रहीम याला विशेष सीबीआय न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या हत्येनंतर तब्बल १६ वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागला होता.

Last Updated : Oct 18, 2021, 5:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.