ETV Bharat / bharat

Top News Today : दिवसभरात कोठे काय असणार आजच्या महत्त्वाच्या घडामोडी , वाचा एका क्लिकवर

author img

By

Published : Nov 8, 2022, 6:54 AM IST

आज दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेवू या. देशभरासह राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा. (Read Top News Today )

Top News Today
आजच्या महत्त्वाच्या घडामोडी

मुंबई : आज दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेवू या. देशभरासह राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा. (Read Top News Today )

  1. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेला नांदेडमधील गुरुद्वारापासून यात्रेला सुरुवात : राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा काल महाराष्ट्रात देगलूर येथे दाखल झाली आहे. आज सकाळी 8.30 वाजता नांदेडमधील गुरुद्वारापासून यात्रेला सुरुवात होईल.

2. आदित्य ठाकरे आज औरंगाबाद, बीड, जालना आणि उस्मानाबादच्या दौऱ्यावर : आदित्य ठाकरे आज औरंगाबाद, बीड, जालना आणि उस्मानाबादच्या दौऱ्यावर आहेत. ते सकाळी 11 वाजता औरंगाबाद येथील पैठण येथे शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करतील आणि शेतकऱ्यांशी संवाद साधतील.

3. शरद पवारांच्या हस्ते सत्याग्रह स्मारकाचा लोकार्पण सोहळा : पंढरपूर येथे साने गुरुजी यांच्या उपोषण स्थळी उभारलेल्या सत्याग्रह स्मारकाचा लोकार्पण सोहळा आज शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. पवार झूमवरून हॉस्पिटल मधून भाषण करणार असून त्यांच्या ऐवजी खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

बारामतीत अब्दुल सत्तार यांच्याविरोधात आंदोलन : कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्या बद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात बारामतीत आंदोलन केले जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सकाळी ९.३० वाजता आंदोलन करण्यात येणार आहे.

4. यवतमाळमध्ये अब्दुल सत्तार यांच्याविरोधात आंदोलन : कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी महिला कॉग्रेस कडून आंदोलन करण्यात येणार आहे.

5.वर्षातील शेवटचे खंडग्रास चंद्रग्रहण : आज देशात चंद्रग्रहणाचं दर्शन होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.