ETV Bharat / bharat

Mumbai Air Hostess Raped मुंबईच्या एअर होस्टेसवर लग्नाच्या बहाण्याने बलात्कार, उज्जैनला तरुणाच्या घरी जाताच केली मारहाण

author img

By

Published : Aug 11, 2022, 6:14 PM IST

मुंबईतील एका एअर होस्टेसने उज्जैनच्या तरुणावर तिला घराबाहेर काढल्याचा आरोप केला आहे. पीडित तरुणीने उज्जैनमधील माधवनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तरुणीने आरोप केला आहे की, ती तरुणासोबत लिव्ह इनमध्ये राहायची. लग्नाच्या बहाण्याने त्याने तिच्यावर बलात्कार केला. आरोपीने लग्नास नकार दिल्याने तरुणीने तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल करून त्याला तुरुंगात डांबले. लग्नाचे आश्वासन देऊन आरोपी तुरुंगातून बाहेर आला आणि तरुणीला घेऊन उज्जैनला घरी गेला. त्यानंतर पुन्हा तरुणीला मारहाण करून घराबाहेर हाकलून दिले. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. Rape of Mumbai air hostess, Rape pretext of marriage, Air hostess complaint to Ujjain police, Mumbai Air Hostess Raped

Mumbai Air Hostess Raped
मुंबईच्या एअर होस्टेसवर लग्नाच्या बहाण्याने बलात्कार

उज्जैन ( मध्यप्रदेश ) मुंबईत एअर होस्टेस म्हणून काम करणाऱ्या आसाममधील तरुणीची मुंबईत राहत असलेल्या मध्यप्रदेशातील उज्जैन येथील तरुणाशी मैत्री झाली. त्यानंतर दोघेही एकत्र राहू लागले. तरुणाने लग्नाच्या बहाण्याने तरुणीवर बलात्कार केला आणि नंतर लग्नास नकार दिला. यानंतर तरुणीने या तरुणाविरुद्ध मुंबईत एफआयआर दाखल केला. त्यानंतर तरुण तुरुंगात राहिला. नंतर तरुणाने लग्न करण्याचे आश्वासन देऊन तरुणीला उज्जैनला आणले. यानंतर तरुणीने पुन्हा लग्नाची विचारणा केल्यानंतर तरुणाने तिला उज्जैन येथे बोलावून फिरण्याच्या बहाण्याने नेले. यादरम्यान तरुणाने तिला मारहाण केली. Rape of Mumbai air hostess, Rape pretext of marriage, Air hostess complaint to Ujjain police

सोशल मीडियावर मैत्री होती तरुणी मुंबईत इंडिगो एअरलाइन्समध्ये एअर होस्टेस आहे. मुंबईतील उज्जैन येथील तरुण अंधेरी पश्चिम येथे कपड्यांचा व्यवसाय करायचा. उज्जैन आर्टिलरीमध्ये राहणाऱ्या आशी खानशी या तरुणीची सोशल मीडियावर मैत्री होती. एअर होस्टेस आणि आशी खान दोन वर्षांपासून लिव्ह-इनमध्ये राहत होते. यानंतर तरुणीने आशी खानला लग्नासाठी विचारले असता त्याने नकार दिला. पीडित मुलीने एप्रिल 2022 मध्ये आरोपीविरुद्ध मुंबई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती आणि न्यायालयाने आरोपीला तुरुंगात पाठवले होते.

मुंबईच्या एअर होस्टेसवर लग्नाच्या बहाण्याने बलात्कार

तरुण गेला तुरुंगात आरोपी आशीच्या कुटुंबीयांनी तरुणीशी बोलून दोघांना लग्नाचे वचन दिले होते. यानंतर आशीने 8 ऑगस्ट रोजी पीडितेला घरी आणले. तरुणाने प्रेयसीला उज्जैन येथील मुनी नगर तलावाजवळ नेले. तेथून त्याने तिला मारहाण करून हाकलून दिले. यानंतर पीडित मुलीने महिला पोलीस ठाणे आणि माधवनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी तरुणीचा जबाब नोंदवून तपास सुरू केला आहे. तर पोलीस स्टेशन प्रभारी मनीष लोढा यांनी या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगितले.

हेही वाचा Rape Case In Bhandara: मदत करण्याच्या बहाण्याने सामूहिक अत्याचार; दोघांना अटक तर एक फरार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.