ETV Bharat / bharat

Ramdas Athawale In Sansad : 'अपोझीशन नहीं है तगडा, इसलिए हो रहा है झगड़ा', आठवलेंनी राज्यसभेत सादर केली कविता

author img

By

Published : Feb 7, 2022, 3:26 PM IST

आज सकाळापासून सुरू झालेल्या कामकाजादरम्यान महाराष्ट्रातील काही खासदारांनी ( MH MPs in Parliament ) सभागृहात प्रश्न उपस्थित केले. यावेळी विशेष म्हणजे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांना राज्यसभेमध्ये बोलण्याची ( Ramdas Athawale In Sansad ) संधी देण्यात आली असता त्यांनी कविता सादर केली.

आठवले
Ramdas Athawale In Sansad

नवी दिल्ली - संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे 31 जानेवरीपासून सुरू झालं आहे. आज सकाळापासून सुरू झालेल्या कामकाजादरम्यान महाराष्ट्रातील काही खासदारांनी ( MH MPs in Parliament ) सभागृहात प्रश्न उपस्थित केले. यावेळी विशेष म्हणजे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांना राज्यसभेमध्ये बोलण्याची संधी ( Ramdas Athawale In Sansad ) देण्यात आली असता त्यांनी कविता सादर केली.

रामदास आठवलेंनी राज्यसभेत सादर केली कविता

रामदास आठवलेंनी खास आपल्या शैलीमध्ये यमक जुळवून पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं. तर विरोधकांवर टीका केली. तसेच त्यांनी राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर आपले मत मांडले. राष्ट्रपतींचे अभिभाषण हे देशाला जोडणारे आणि विकासावरील होते, असे ते म्हणाले.

विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खडके यांचे आठवले यांनी कौतूक केले. तसचे टोलाही लगावला. काँग्रेसने खरगे यांना विरोधी पक्षनेते केले. मी अभिनंदन करतो. पण मुख्यमंत्री करण्याची संधी कर्नाटकात आली होती, तेव्हा मात्र केले नाही. त्यांना मुख्यमंत्री करण्याची गरज होती, असे आठवले म्हणाले. यावर सभापती हरिवंश यांनी त्यांना अडवत राष्ट्रपतींच्या आभिषणावर बोलण्याची विनंती केली.

आठवलेंनी सादर केलेली कविता पुढीलप्रमाणे -

ये मोदी जी के सरकार के विकास का अरसा है,

उसमें अनेक योजनाओं का बारिश बरसा है,

हरियाणा में तो सिरसा है,

आदिवासियों का नेता मुंडा बिरसा है।

एनडीए सरकार को मत दो गाली,

नरेंद्र मोदी है सबके वाली,

काँग्रेस की आ गई है रात काली ,

काँग्रेसवालो हमको देदो ताली,

नरेंद्र मोदी जी के कारण, दलित राष्ट्रपती बना,

उंचा हो गया सारे दलितो का सीना,

देश का विकास नही हो सकता, मोदी जी के बिना

असं या कवितेच्या माध्यमातून आठवले म्हणाले. यावेळी सत्ताधारी पक्षाचे खासदार मात्र या कवितेवर मनसोक्त हसताना दिसले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.