ETV Bharat / bharat

Narendra Modi Targets Opposition : पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्लाबोल; भारत छोडो चळवळीतील स्वातंत्र्यवीरांना आदरांजली

author img

By

Published : Aug 9, 2023, 12:57 PM IST

विरोधकांनी एकत्र येत 'इंडिया' ही नवी आघाडी उघडून सत्ताधारी भाजपाला आव्हान दिले आहे. मात्र केंद्र सरकारमधील नेत्यांनी वारंवार 'इंडिया'वर हल्लाबोल केला आहे. भाजपाच्या अनेक खासदारांनी विरोधकांच्या आघाडीला 'घमंडिया गठबंधन' म्हणून त्यांच्यावर टीका केली आहे.

Narendra Modi Targets Opposition
पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : भारतीय इतिहासात 9 ऑगस्ट 1942 या दिवशी महात्मा गांधी यांनी इंग्रजांना 'भारत छोडो' चळवळीचा नारा दिला होता. त्यामुळे भाजपा आज देशभरात 'भारत छोडो' चळवळीत सहभागी झालेल्या नेत्यांना आदरांजली वाहत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'भारत छोडो' चळवळीत सहभागी झाले ल्या स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधींनी सुरू केलेल्या चळवळीचे स्मरण करत भारत आज भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरणाविरोधात उभा असल्याचे यावेळी स्पष्ट केले.

स्वातंत्र्य मिळवण्यात मोठी भूमिका : महात्मा गांधी यांनी 1942 मध्ये 'भारत छोडो' चळवळ सुरू केली होती. या चळवळीचे भारतीयांना स्वातंत्र्य मिळवण्यात मोठे योगदान होते. त्यामुळे 'भारत छोडो' आंदोलन सुरू झाल्यानंतर 5 वर्षाने भारत स्वतंत्र झाला. भारतीय स्वातंत्र्याच्या या चळवळीत सहभागी झालेल्या सगळ्या स्वातंत्र्यवीरांना आदरांजली, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

स्वातंत्र्य चळवळीत 'छोडो भारत' आंदोलनामुळे ऊर्जा : भारत पारतंत्र्यात असताना महात्मा गांधी यांनी 9 ऑगस्ट 1942 ला इंग्रजांविरुद्ध 'भारत छोडो' चळवळ सुरू केली होती. 'भारत छोडो' आंदोलनाचा मोठा परिणाम भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले. आज भारत 'भष्टाचार छोडो', 'वंशवाद छोडो' असे म्हणत असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.

'भारत छोडो' चळवळीवरुन विरोधकांवर हल्लाबोल : 'भारत छोडो' ही चळवळ महात्मा गांधी यांनी आजच्याच दिवशी सुरु केली होती. त्या चळवळीच्या निमित्ताने भाजपने देशभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही 'भारत छोडो' चळवळीच्या निमित्ताने सत्ताधारी भाजपाने विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. भाजपाचे खासदार रवि किशन यांनी विरोधकांवर हल्लाबोल करत घराणेशाही, भ्रष्टाचारावरुन विरोधकांवर टीका केली. तर केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही विरोधकांवर हल्लाबोल करताना 'इंडिया'च्या घटक पक्षांना 'घमंडिया गठबंधन' असे म्हटले आहे.

हेही वाचा -

  1. Parliament Monsoon Session 2023 : अधिवेशनापूर्वी काँग्रेस खासदारांची आज बैठक; राहुल गांधी अविश्वास प्रस्तावावर बोलण्याची शक्यता
  2. Rahul Gandhi : खासदारकीपाठोपाठ बंगलाही परत मिळाला, राहुल गांधी म्हणतात..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.