ETV Bharat / bharat

Raksha Bandhan तब्बल 1 हजार 540 बहिणी, भाऊ-बहिणीच्या प्रेमाची एक अद्भुत कहाणी

author img

By

Published : Aug 11, 2022, 6:30 PM IST

रक्षाबंधनाच्या ( Raksha Bandhan ) दिवशी भाऊ-बहिणीच्या प्रेमाची एक अद्भुत कहाणी सुरतमधून ( Surat ) समोर आली आहे. सुरतमध्ये अशा अनेक बहिणी आहेत की, राखी बांधल्यानंतर भावाचे मनगट गळून पडते. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण सुरतच्या चिराग दोषीला ( Chirag Doshi ) 20, 50 किंवा 100 नाही तर तब्बल 1 हजार 540 बहिणी आहेत.

Etv BharatRaksha Bandhan
रक्षाबंधन

सूरत : भाऊ आणि बहिणीमधील अपार प्रेमाचे प्रतीक म्हणजे रक्षाबंधन ( Raksha Bandhan ) . या पवित्र सणाला एक बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते. तसेच दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देते. मग या रक्षाबंधनाच्या ( Raksha Bandhan ) दिवशी भाऊ-बहिणीच्या प्रेमाची एक अद्भुत कहाणी सुरतमधून ( Surat ) समोर आली आहे. सुरतमध्ये अशा अनेक बहिणी आहेत की, राखी बांधल्यानंतर भावाचे मनगट गळून पडते. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण सुरतच्या चिराग दोषीला ( Chirag Doshi ) 20, 50 किंवा 100 नाही तर तब्बल 1 हजार 540 बहिणी आहेत.

एक आठवडा रक्षाबंधन - रक्षाबंधन हे एक दिवसाचे असते पण, सुरतमधील चिराग दोषी हे एक आठवडा रक्षाबंधन साजरे करतात. कारण त्याला एवढ्या बहिणी आहेत की, फक्त रक्षाबंधनाच्या ( sisters on Raksha Bandhan ) निमित्ताने त्या सगळ्यांना जाऊन राखी बांधणे त्याला शक्य नाही. त्यांना 1हजार 540 बहिणी आहेत. दरवर्षी त्यांच्या बहिणींची संख्या वाढत आहे. चिराग दोषी त्यांच्या सर्व बहिणींची काळजी घेतात. प्रत्येक त्यांना भेटायलाही जातात. विशेषत: रक्षाबंधनाच्या दिवशी सर्व बहिणींना राखी आणि मिठाई घेऊन जातात.

बहिणी मला ऊर्जा देतात - सुरतमधील बांधकाम व्यावसायिक चिराग दोषी म्हणाले, "काही लोक इतके भाग्यवान नाहीत की एक देखील बहीण नाही. परंतु माझ्याजवळ 1हजार 540 बहिणी आहेत." माझ्या फक्त गुजरातमध्येच नाही तर, इतर राज्यातही बहिणी आहेत. या बहिणी मला ऊर्जा देतात. त्याचबरोबर सेवा कार्याची त्यांच्याकडून प्रेरणाही मिळते. स्त्री शक्तीची पूजा केल्याने मला लोकांची सेवा करण्याचा उत्साह मिळतो. मला आगामी काळात 2 हजार 100 बहिणी हव्या आहेत. कारण मला बहिणींचे अधिक प्रेम हवे आहे. एचआयव्हीग्रस्त, कॅन्सरग्रस्त भगिनी आणि इतर क्षेत्रातील भगिनीही मला राख्या बांधतात.

रचना डोलिया म्हणाल्या की, चिरागच्या १ हजार ५४० बहिणींपैकी मी एक आहे. असा भाऊ मला मिळाला हे बरं वाटतं. आमच्या चांगल्या काळात चिराग आमच्यासोबत आहे. पण, त्रास झाला तरी ते आधी येतात. जेव्हा त्याचा कॉल मला येतो तेव्हा मी दुःखी आहे हे त्याला कसे कळते हे त्याला माहित नाही. त्याचं नावही चिराग कामही चिरागसारखंच असल्याच्या त्या म्हणाल्या.

हेही वाचा - Achievements75 भारतातील टॉप 5 महिला उद्योजिका, वाचा प्रेरणादायी यशोगाथा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.