ETV Bharat / bharat

काय सांगता! प्रवाशानं चक्क विमानाच्या टॉयलेटमध्ये बसून केला प्रवास

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 17, 2024, 3:35 PM IST

Flight Passenger Stuck In Toilet : स्पाईसजेटच्या मुंबई-बेंगळुरू फ्लाइटमध्ये एक विचित्र प्रकार घडला. विमानातील एका प्रवाशानं चक्क टॉयलेटमध्ये बसून संपूर्ण प्रवास केला. काय आहे हे प्रकरण, जाणून घेण्यासाठी वाचा पूर्ण बातमी.

Flight Passenger Stuck In Toilet
Flight Passenger Stuck In Toilet

मुंबई Flight Passenger Stuck In Toilet : स्पाईसजेट एअरलाइनच्या विमानात नुकताच एक विचित्र प्रकार घडला. या घटनेनंतर आता विमान कंपन्यांच्या सुविधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

विमानाच्या टॉयलेटमध्ये बसून प्रवास केला : झालं असं की, स्पाईसजेटच्या फ्लाईटचं तिकीट असलेल्या एका प्रवाशाला चक्क विमानाच्या टॉयलेटमध्ये बसून संपूर्ण प्रवास करावा लागला! कमाल म्हणजे, या प्रवाशाला विमान उतरल्यानंतरच बाहेर काढता आलं. या घटनेनंतर आता स्पायजेटकडून त्याला पूर्ण परतावा दिला जाणार आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण : ही घटना मंगळवारी (16 जानेवारी) स्पाईसजेटच्या मुंबई-बेंगळुरू फ्लाइटमध्ये घडली. हा प्रवासी विमानाच्या टॉयलेटमध्ये गेला आणि तासाभराहून अधिक वेळ झाला तरी बाहेरच आला नाही. झालं असं की, वॉशरूमचा दरवाजा अडकला होता की जो त्याला उघडता आला नाही. दरवाजाच्या लॉकमध्ये दोष होता आणि संपूर्ण फ्लाइट दरम्यान सर्व प्रयत्न करूनही त्याला उघडता आला नाही. विमान बेंगळुरूमध्ये उतरल्यानंतर इंजिनिअरच्या मदतीनं हा दरवाजा उघडण्यात आला आणि त्यानंतर अडकलेल्या प्रवाशाला बाहेर काढण्यात आलं.

स्पाईसजेटनं माफी मागितली : झालेल्या या प्रकाराबद्दल स्पाईसजेटनं प्रवाशाची माफी मागितली आहे. या घटनेनंतर विमान कंपनीनं सांगितलं की, संपूर्ण प्रवासादरम्यान प्रवाशाला मदत आणि मार्गदर्शन करण्यात आलं. जेव्हा चालक दलातील सदस्यांना प्रवासी अडकल्याचं समजलं तेव्हा त्यांनी दरवाज्याखाली एक चिठ्ठी सरकवली आणि प्रवाशाला धीर दिला. आम्ही दरवाजा उघडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. मात्र आम्हाला दरवाजा उघडता येत नाही. काळजी करू नका, काही मिनिटांत विमान उतरेल, असं या चिठ्ठीत लिहिलं होतं. या गैरसोयीबद्दल माफी मागितल्यानंतर विमान कंपनीनं आता प्रवाशाला परतावा दिला आहे.

हे वाचलंत का :

  1. इंडिगोची वेबसाईटसह इतर ऑनलाईन सेवा बंद, जाणून घ्या कारण
  2. आता मुंबईहून अयोध्येला करा नॉन-स्टॉप प्रवास! स्पाईसजेट सुरू करणार डायरेक्ट फ्लाइट
  3. दाट धुक्याचा विमानसेवा, रेल्वेला फटका; 17 विमान रद्द, रेल्वेसेवा विस्कळीत
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.