ETV Bharat / bharat

National Javelin Day : पानिपतमध्ये जिल्हास्तरीय भालाफेक स्पर्धेचे आयोजन; 250 हून अधिक खेळाडूंचा सहभाग

author img

By

Published : Aug 7, 2022, 4:03 PM IST

7 ऑगस्ट हा दिवस देशात भालाफेक दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे ( National Javelin Throw Day ). हरियाणातील पानिपत जिल्ह्यातील खंडारा या छोट्याशा गावात जिथे नीरज हा एकमेव खेळाडू होता. आज त्याच गावातले ७० तरुण भालाफेक खेळाचा सराव करत आहेत.

National Javelin Day
भालाफेक स्पर्धा

पानिपत ( हरियाणा ) - टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने भालाफेकमध्ये सुवर्ण पदक जिंकले ( Neeraj Chopra Won Gold In javelin ) . त्यानंतर 7 ऑगस्ट हा दिवस देशात भालाफेक दिन म्हणून साजरा करण्यास सुरूवात झाली ( National Javelin Throw Day ). त्यामुळे देशात आज पहिला भालाफेक दिन साजरा करण्यात आला ( First Javelin Throw Day ). हरियाणातील पानिपत जिल्ह्यातील खंडारा या छोट्याशा गावात जिथे नीरज हा एकमेव खेळाडू होता. आज त्याच गावातले ७० तरुण भालाफेक खेळाचा सराव करत आहेत.

भालाफेक खेळाडूंमध्ये सातत्याने वाढ - टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत नीरजने सुवर्णपदक जिंकल्यानंतर भालाफेक खेळाला नवी ओळख मिळाली. आता या खेळात खेळाडूंची संख्या सातत्याने वाढत आहे. गावागावापासून ते शहरांपर्यंत मुले-मुली भालाफेकचा सराव करत आहेत. गेल्या वर्षी शिवाजी स्टेडियम पानिपत येथे झालेल्या जिल्हास्तरीय भालाफेक स्पर्धेत 250 हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता ( Javelin Competition in Panipat ). याचे आयोजकांनाही आश्चर्य वाटले. नीरजची चुलत बहीण नॅन्सी हिनेही या स्पर्धेत पदक जिंकले. याशिवाय अनेक प्रतिभावान खेळाडू पुढे आले.

खेळाडूंमध्ये वाढला कल- नीरजचे काका भीम चोप्रा यांनी सांगितले की, ७ ऑगस्ट हा खास दिवस आहे. कारण हा दिवस भालाफेक दिन म्हणून साजरा केला जात आहे. कर्नाल येथे झालेल्या राज्यस्तरीय भालाफेक स्पर्धेत त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. आमच्या गावातील 70 मुले दररोज भालाफेकचा सराव करतात असे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, पुतण्या नीरजने पदक जिंकल्यानंतर एक प्रेरणा निर्माण झाली आहे. सहभागी खेळाडूंपैकी सुमारे तीन मुले राज्यस्तरावरही खेळली आहेत. त्यामुळे मुलांमध्ये वेगळाच उत्साह पहायला मिळाला.

हेही वाचा - National Javelin Day : देशात 7 ऑगस्टला प्रथमच साजरा होणारा राष्ट्रीय भालाफेक दिन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.