ETV Bharat / bharat

Mob Lynching : गायींच्या तस्करीचा आरोप करत अमरावतीच्या एकाची मध्यप्रदेशात हत्या.. दोघे गंभीर जखमी

author img

By

Published : Aug 3, 2022, 5:30 PM IST

Updated : Aug 3, 2022, 9:00 PM IST

नर्मदापुरममध्ये लोकांनी गाय तस्करीचा आरोप करत लोकांनी एका तरुणाला बेदम मारहाण करत त्याची हत्या केली. तर त्याच्यासोबत असलेले दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृत आणि जखमी हे सर्व महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ( Narmadapuram Mob Lynching ) ( Mob Lynching In Cow Trafficking Case ) ( narmadapuram Cow Trafficking ) ( Cow smugglers beaten to death in Narmadapuram ) ( man from Amravati was killed in MP )

Etv BharatMOB LYNCHING IN COW TRAFFICKING CASE IN NARMADAPURAM
गायींच्या तस्करीचा आरोप करत अमरावतीच्या एकाची मध्यप्रदेशात हत्या.. दोघे गंभीर जखमी

नर्मदापुरम ( मध्यप्रदेश ) : जिल्ह्यातील सिवनी माळवा तालुक्यात गाय तस्करीचा आरोप करत एका तरुणाला बेदम मारहाण करून त्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. दोन डझनहून अधिक गायी ट्रकमध्ये भरून घेऊन जाण्यात येत होत्या. ही बातमी समजताच संतप्त लोकांनी ट्रक पकडून एका गाय तस्करीचा आरोप करत बेदम मारहाण केली. या घटनेत २ जण गंभीर जखमी झाले आहेत. ( Narmadapuram Mob Lynching ) ( Mob Lynching In Cow Trafficking Case ) ( narmadapuram Cow Trafficking ) ( Cow smugglers beaten to death in Narmadapuram ) ( man from Amravati was killed in MP )

जखमींवर उपचार सुरू : नजीर अहमद असे मृत युवकाचे नाव आहे. तर लाला शेख आणि मुस्ताक अहमद असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. संपूर्ण प्रकरण सिवनी माळवा तहसीलमधील बारखड गावचे आहे. जिथे गाय तस्करीचा आरोप करत तरुणांना टेम्पोसह रोखून त्यांना बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. जो महाराष्ट्र अमरावतीचा रहिवासी असल्याचे सांगितले जाते. याशिवाय 2 जण गंभीर जखमी आहेत. सध्या जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

गायींच्या तस्करीचा आरोप करत अमरावतीच्या एकाची मध्यप्रदेशात हत्या.. दोघे गंभीर जखमी

भाजप नेत्यांसह अनेक अधिकारी घटनास्थळी पोहोचले : या प्रकरणाची माहिती मिळताच भाजपचे अनेक नेतेही घटनास्थळी पोहोचले. तर डीआयजी, एसपी, जिल्हाधिकारी यांनीही घटनास्थळी पोहोचून घटनेचा आढावा घेतला. एफएसएलच्या टीमनेही घटनास्थळी पोहोचून घटनास्थळाची पाहणी केली.

गुन्हा दाखल : यादरम्यान एसपी गुरकरण सिंह यांनी सांगितले की, "रात्री साडेबारा वाजता एक घटना घडली, ज्यात ट्रक अवैधरित्या गायी घेऊन जात होता. महाराष्ट्रातील अमरावती येथील लोक होते, त्यांना 10 ते 12 जणांनी मारहाण केली. दोन उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर 2 जणांवर उपचार सुरू आहेत.या घटनेत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तसेच अवैध गोवंश तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : गुरुग्रामध्ये गो-तस्करांनी बजरंगदलाच्या कार्यकर्त्यांवर झाडल्या गोळ्या

Last Updated : Aug 3, 2022, 9:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.