काशीमध्ये महानाट्य! ‘जाणता राजा’ प्रेक्षकांच्या भेटीला, किल्ल्यासारखा 60 फूट उंचीचा स्टेज अन् जिवंत देखावा

काशीमध्ये महानाट्य! ‘जाणता राजा’ प्रेक्षकांच्या भेटीला, किल्ल्यासारखा 60 फूट उंचीचा स्टेज अन् जिवंत देखावा
Janata Raja Mahanatya : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘जाणता राजा’ या महानाट्याचा प्रयोग वाराणसीत करण्याची तयारी सुरू आहे. चला जाणून घेऊया या महानाट्याच्या रंगमंचाशी संबंधित खास गोष्टी.
वाराणसी Janata Raja Mahanatya : सध्या बीएचयूमध्ये जाणता राजा महानाट्याची जोरदार तयारी सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित जाणता राजा महानाट्याचे प्रयोग बनारसमध्ये भव्य आणि आकर्षक मंचावर होणार आहेत. याकरता 60 फूट उंचीचा रंगमंच असणार आहे. यासाठी सुमारे 200 कलाकार 12 ट्रक माल घेऊन काशीला आले आहेत. दरम्यान, दररोज सुमारे 7000 लोक हा प्रयोग पाहतील.
काशी ही देशाची सांस्कृतिक राजधानी असल्याचं सर्वांनाच माहीत आहे. यासोबतच हिंदुत्वाचंही ते मोठं केंद्र असून छत्रपती शिवरायांचंही काशीशी घनिष्ट नातं होतं. त्यांच्या जीवनाशी निगडीत ‘जाणता राजा’ या महानाट्याचे काशी येथे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी काशी हिंदू विद्यापीठाच्या अॅम्फी थिएटर मैदानावर शिवाजी महाराजांचा भव्य किल्ला तयार करण्यात आलाय. या किल्ल्यात जाणता राजा हे नाटक रंगणार आहे. 21 नोव्हेंबर रोजी तुळजा भवानीच्या आरतीनं जाणता राजा महानाट्याची सुरुवात होणार असून तुळजा भवानीची भव्य मूर्तीही काशीत पोहोचली आहे.
सहा दिवसांत 42000 प्रेक्षक हे महानाट्य बघतील : कार्यक्रमाचे समन्वयक ज्ञानप्रकाश मिश्रा म्हणाले की, 'काशी हे हिंदुत्वाचं मोठं केंद्र आहे. भारतातील प्रत्येकानं छत्रपती शिवाजी महाराजांना रंगभूमीच्या माध्यमातून समजून घेतलं तर ती व्यक्ती कधीही देशाविरोधात जाऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रत्येक क्षण देशभक्ती, सांस्कृतिक परंपरा आणि मूल्यांना समर्पित होता. छत्रपती शिवरायांना प्रत्येक भारतीयानं वाचलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे आणि पाहिलं पाहिजे. 21 नोव्हेंबरपासून या भव्य नाटकाच्या प्रयोगाला सुरुवात होणार आहे. तसंच हे महानाट्य 26 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. दररोज 5:30 ते 8:30 या वेळेत तीन तासांचा नाट्यप्रयोग होणार असून ही नाट्यनिर्मिती 7000 लोक एकत्रित पाहतील. 6 दिवसात जवळपास 42,000 प्रेक्षक हे महानाट्य बघतील.
किल्ल्यासारखा 60 फूट उंचीचा मंच, अन् जिवंत देखावा : मंच तयार करणारे त्रिलोकी नाथ म्हणाले, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवे बदलले की स्टेजची रचना बदलते. यासाठी दोन टॉवर्स तयार करण्यात आले आहेत, जे शो नुसार फिरतील. यासोबतच उंट, हत्ती आणि घोडेही या महानाट्यात असतील. या स्टेजिंगमध्ये कलाकारांसह 300 लोक काम करत आहेत. नाटकासाठी किल्ल्यासारखा सुमारे 60 फूट उंचीचा स्टेज तयार करण्यात येत आहे. यात शाही दरबार, राजवाडा, सैनिक, पायऱ्या इत्यादी असतील. यासोबतच हत्ती, घोडे, उंट, बैलगाडी, पालखी यांचाही या महानाट्यात समावेश असेल, 100 तंत्रज्ञांच्या मदतीने हा नाट्यमंच तयार केला जात आहे.
हेही वाचा -
