ETV Bharat / bharat

Srinagar Encounter : श्रीनगरमध्ये 3 दशतवाद्यांचा खात्मा; 4 जवान जखमी

author img

By

Published : Dec 31, 2021, 1:43 PM IST

श्रीनगरच्या बाहेर पंथाचौक भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक ( Terrorist killed in South Kashmir ) झाली. यात 3 दहशतवादी ठार झाले आहेत. तर 4 जवान जखमी झाले. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यता आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

श्रीनगर
Srinagar Encounter

श्रीनगर - जम्मू काश्मीर खोऱ्यात शांततेला सुरुंग लावणाऱ्या दहशतवाद्यांचा नेस्तानाबूत करण्यासाठी सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. श्रीनगरच्या बाहेर पंथाचौक भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक ( Terrorist killed in South Kashmir ) झाली. यात 3 दहशतवादी ठार झाले आहेत. तर 4 जवान जखमी झाले. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यता आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी याबाबत माहिती दिली. जम्मू-काश्मीर पोलीस आणि सुरक्षा दलाचे जवान यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. पंथाचौक भागातील एका इमारतीमध्ये काही दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. त्यानुसार पोलिस आणि सुरक्षा दलांनी त्या परिसराला घेराव घातला. दरम्यान इमारतीमध्ये लपलेल्या दहशवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबाराला सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिलं.

बुधवारी 6 दशतवाद्यांचा खात्मा -

गेल्या 24 तासांत 9 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. गुरुवारी सैन्याला मोठं यश मिळालं होतं. गुरुवारी सैन्याने 6 दहशतवाद्यांना ठार केले होते. दक्षिण काश्मीरमधील कुलगाम आणि अनंतनाग जिल्ह्यांमध्ये बुधवारी संध्याकाळपासून दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक ( Terrorist killed in South Kashmir ) झाली. यात सहा दहशतवादी ठार झाले आहेत. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी याबाबत माहिती दिली. आतापर्यंत ठार झालेल्या सहापैकी चार जणांची ओळख पटली होती. यातील दोन हे पाकिस्तानी आणि दोन स्थानिक दहशतवादी असल्याचे काश्मीर झोन पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा - South Kashmir Encounter : लष्कराची मोहीम फत्ते! 6 दशतवाद्यांचा खात्मा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.