ETV Bharat / bharat

India vs Zimbabwe ODI Series भारतीय क्रिकेट संघ तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी झिम्बाब्वेला रवाना

author img

By

Published : Aug 13, 2022, 6:16 PM IST

टीम इंडिया 18 20 आणि 22 ऑगस्ट रोजी हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध तीन वनडे खेळणार Zimbabwe vs India ODI Series आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेसाठी केएल राहुल संघाचे नेतृत्व करणार आहे.

India team
भारतीय संघ

नवी दिल्ली सलामीवीर केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ 18 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी शनिवारी सकाळी झिम्बाब्वेला रवाना Indian team leaves for Zimbabwe झाला. प्रसिद्ध कृष्णा, दीपक चहर, शिखर धवन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, रुतुराज गायकवाड आणि राहुल त्रिपाठी यांचे फोटो भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या BCCI सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करण्यात आले आहेत. एनसीएचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण हे देखील फोटोत दिसले. झिम्बाब्वे दौऱ्यासाठी लक्ष्मणला मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले आहे.

टीम इंडिया 18, 20 आणि 22 ऑगस्ट रोजी हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध तीन वनडे Zimbabwe vs India ODI Series खेळणार आहे. टीम इंडिया झिम्बाब्वेला रवाना झाल्याची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली. 11 ऑगस्ट रोजी संघात समाविष्ट झालेल्या राहुलकडे भारताचे कर्णधारपद असेल. शिखर धवनच्या जागी तो नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारणार आहे.

वनडे मालिकेसाठी भारतीय संघ कर्णधार केएल राहुल Captain KL Rahul, उपकर्णधार शिखर धवन, रुतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, विकेटकीपर इशान किशन, विकेटकीपर संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज आणि दीपक चहर.

हेही वाचा Ms Dhoni Changed Dp स्वातंत्र्याच्या अमृतोत्सवासाठी धोनी सोशल मीडियावर सक्रिय बदलला डीपी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.