ETV Bharat / bharat

Honeymoon : हनिमूनला पतीने टाकली 'ही' घृणास्पद अट, लग्नाच्या तीन महिन्यांनंतरही नवरी हनिमुनविनाच

author img

By

Published : May 18, 2023, 8:06 PM IST

पिलीभीतमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाच्या तीन महिन्यांनंतरही नवऱ्याने हनिमून साजरा केला नाही, असा आरोप वधूने केला आहे. आधी हुंड्यासाठी 10 लाख रुपये आणा, मग मी हनिमून साजरा करेन असे पतीने सासरच्या मंडळींना सांगितले आहे.

Honeymoon
Honeymoon

पिलीभीत : लग्नानंतर हनिमून साजरा करण्यासाठी पतीने सासरच्यांकडे 10 लाख रुपयांची मागणी केली होती. सासरच्या मंडळींनी पाच लाख दिले. तो नौनीताललाही गेला मात्र, त्याने पत्नीसोबत हनिमून साजरा केला नाही. तिथे हनिमून साजरा करण्याऐवजी त्याने अश्लील व्हिडिओ बनवले. तिचे फोटोही काढले. आता पती सासरकडून आणखी पाच लाख रुपये हनीमूनसाठी मागत आहे. पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी पती आणि सासूविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पत्नीसोबत हनिमून साजरा केलाच नाही : लग्नानंतर हनिमून साजरा करण्यासाठी पैसे मागितल्याची ही विचित्र घटना शहरातील कोतवाली भागातील आहे. सिटी कोतवाल नरेश त्यागी यांनी सांगितले की, या वर्षी 6 फेब्रुवारी 2023 रोजी एका मुलीचे लग्न बदाऊनमधील बिसौली पोलिस ठाण्यातील तरुणासोबत झाले होते. मुलीच्या कुटुंबीयांनी लग्नात 20 लाख रुपये खर्च केले होते. 15 लाखांचे मौल्यवान दागिनेही देण्यात आले. लग्नानंतर पतीने हनिमून साजरा केला नाही, असा आरोप पत्नीने केला आहे. नवरा तिच्यापासून अंतर ठेवायचा. याबाबत पत्नीने जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता प्रकरण टाळण्यात आले. अशातच तीन महिने निघून गेले. 29 मार्च रोजी पीडितेने या प्रकरणाची माहिती सासूला सांगितली, मात्र त्यांनीही लक्ष दिले नाही.

10 लाख रुपये द्यामगच हनिमून : काही दिवसांनी पीडिता तिच्या माहेरी पिलीभीत येथे आली. येथे तीने आईला सर्व प्रकार सांगितला. दरम्यान, 12 एप्रिल रोजी पती तिला घेण्यासाठी पिलीभीत येथे आला. यावर नवविवाहित महिलेच्या आईने जावायाशी चर्चा केली. तुम्हाला कोणताही आजार असेल तर सांगा, त्यावर उपचार करता येतील. पती-पत्नीमधील अशाप्रकारचे अंतर योग्य नाही. यावर जावाई म्हणाला की 10 लाख रुपये द्या, मग आम्ही हनिमूनला जाऊ. यानंतर सासरच्यांनी ५ लाख जावायाला हनिमुन साजरा करण्यासाठी दिले.

पतीविरुद्ध तक्रार दाखल : यानंतर ७ मे रोजी दोघेही हनिमूनला नैनितालला गेले. विवाहित महिलेचा आरोप आहे की, तिथेही पतीने हनिमून साजरा केला नाही. तो विलंब करत राहिला. यावेळी विवाहितेचे अश्लील व्हिडिओ, फोटो काढण्यात आले. विवाहितेच्या प्रश्नावर पती म्हणाला की, उरलेले पाच लाख रुपये घेऊन ये, मग आपण हनिमून साजरा करू. पैसे न मिळाल्यास अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. पतीच्या वागणुकीला कंटाळून विवाहित महिला १३ मे रोजी माहेरी आली. घडलेला सर्व प्रकार घरच्यांना सांगितला. यानंतर पीडितेने पिलीभीत पोलिस ठाण्यात सासू, पतीविरुद्ध तक्रार दाखल केली. या प्रकरणी मारहाण, शिवीगाळ हुंडा मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा -

  1. Tulja Bhavani Temple News : अंगावर तोकडे कपडे घालणाऱ्या भाविकांना तुळजापूर मंदिरात दर्शनास मनाई
  2. SC verdict on Jallikattu bullock cart: हुर्रे.. बैलगाडी शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने दिली परवानगी, शर्यती घेण्याचा मार्ग मोकळा
  3. Law Minister of country: किरेन रिजीजू यांना कायदेमंत्री पदावरून हटविले; अर्जुन मेघवाल देशाचे नवे कायदा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.