ETV Bharat / bharat

gujarat drug case : गुजरातमध्ये 350 कोटींचे ड्रग्ज जप्त, पाकिस्तानातून समुद्रीमार्गे गुजरातमध्ये

author img

By

Published : Nov 11, 2021, 12:22 PM IST

Updated : Nov 11, 2021, 12:31 PM IST

देवभूमी द्वारका आणि सुरत येथून 66 किलो अंदाजे 350 कोटी रुपये किंमतीचे ड्रग्ज जप्त केले आहेत. 16 किलो हेरॉईन आणि 50 किलो एमडी ड्रग्ज आहे. हे ड्रग्ज पाकिस्तानातून समुद्रीमार्गे गुजरातमध्ये आणले जात होते, अशी माहिती समोर आली आहे. एटीएस, एलसीबी आणि एसओजीच्या पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली.

Gujarat drug hauls:
Gujarat drug hauls: गुजरातमध्ये 350 कोटींचे ड्रग्ज जप्त, पाकिस्तानातून समुद्रीमार्गे गुजरातमध्ये

अहमदाबाद - गुजरात पोलिसांनी ड्रग्जविरोधी (gujarat drug case )मोठी कारवाई केली आहे. देवभूमी द्वारका आणि सुरत येथून 66 किलो अंदाजे 350 कोटी रुपये किंमतीचे ड्रग्ज जप्त केले आहेत. 16 किलो हेरॉईन आणि 50 किलो एमडी ड्रग्ज आहे. हे ड्रग्ज पाकिस्तानातून समुद्रीमार्गे गुजरातमध्ये आणले जात होते, अशी माहिती समोर आली आहे. एटीएस, एलसीबी आणि एसओजीच्या पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली.

समुद्रमार्गे अमली पदार्थांची तस्करी होत असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे देवभूमी द्वारका पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तिघांना अटक केली. एका आरोपीला वडिनारजवळ 14 ते 15 किलो ड्रग्जसह पकडण्यात आले. त्याचे बाजारमूल्य अंदाजे 70 कोटी रुपये आहे.

सलीम कारा आणि अली कारा यांच्याकडून सर्वाधिक अमली पदार्थ जप्त करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव सज्जाद असे असून तो महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरात राहणारा असल्याची प्राथमिक माहिती आहे. सज्जाद हा ठाण्यातील मुंब्रा परिसरातील भाजी विक्रेता आहे. त्याच्याकडून बॅगमधून 19 पॅकेट्स जप्त करण्यात आली आहे. तक्यामध्ये 11.483 किलोग्रॅम हेरॉईन आणि 6.168 किलोग्रॅम मेथामेफटामाइन आढळून आले आहे. तर इतर दोघांकडून 17.65 किलोग्रॅम अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. सलीम याकुब करा आणि अली याकुब करा या जामनगरमध्ये राहणाऱ्या दोघांनी त्याला ड्रग्ज दिले. पोलिसांनी त्यांच्या घरी छापेमारी केल्यानंतर आणखी 47 पाकिटं सापडली.

दरम्यान, आज सुरतमध्ये 5.85 लाख रुपयांचे एमडी ड्रग्जही जप्त करण्यात आले. भगवती प्रसाद नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली असून तो राजस्थानमध्ये वाँटेड असल्याचे घोषित करण्यात आले आहे. सुरतमधील पुना परिसरातील निओल चोकडी येथून एमडी ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला आहे. राजस्थानमधून ड्रग्ज सुरतमध्ये आणले होते.

महाराष्ट्रातील नेत्यांच्या प्रतिक्रिया -

गुजरातमध्ये 350 किलो ड्रग्ज सापडले आहे. तिथे एनसीबीचे पथक काय काम करते ते पाहावे असा टोला शिवसेना नेते संजय राऊतांनी लगावला आहे. तर गुजरातमधून देशभरात ड्रग्ज पसरवले जात आहे. हा ड्रग्जचा खेळ गुजरातमुधून चालवला जातो का, असा प्रश्न राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. मुंबईत काही ग्रॅम ड्रग्ज सापडले की मुंबईत ड्रग्जचा धंदा सुरु असल्याचे मुंबईला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. मग गुजरातमध्ये ३५० कोटींचे ड्रग्ज सापडत असेल तर त्याचा कसून तपास झाला पाहिजे, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.

हेही वाचा - ड्रग्जचा खेळ गुजरातमुधून चालवला जातोका? - नवाब मलिक

Last Updated : Nov 11, 2021, 12:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.