ETV Bharat / bharat

म्यानमारमधून कमरेला बांधून आणली सोन्याची 20 बिस्कीट; सांगलीतील एकासह दोन तस्करांना वाराणसीत अटक

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 8, 2024, 11:14 AM IST

Gold Smuggling in Brahmaputra Express : महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पथकानं सोन्याच्या बिस्किटांसह दोन तस्करांना अटक केलीय. एक तस्कर महाराष्ट्राचा तर दुसरा तामिळनाडूचा आहे. त्यांच्याकडून 2 कोटी रुपयांचं सोनं जप्त करण्यात आलंय.

Gold Smuggling in Brahmaputra Express
Gold Smuggling in Brahmaputra Express

वाराणसी Gold Smuggling in Brahmaputra Express : वाराणसी सिटी रेल्वे स्थानकावर रेल्वेतून सोन्याची तस्करी करताना डीआरआयच्या पथकानं दोघांना पकडलंय. या पथकानं रेल्वेतून आणलेल्या 2 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या अवैध सोन्याची बिस्कीटं जप्त केली आहेत. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी म्हणजेच डीआरआयनं म्यानमारमधून तस्करी करणाऱ्या महाराष्ट्र आणि तामिळनाडू येथील रहिवासी असलेल्या दोन तस्करांना अटक केलीय. त्यांच्या ताब्यातून 3 किलो 320 ग्रॅम सोनं जप्त करण्यात आलंय. याची किंमत 2 कोटी 7 लाख 84 हजार 139 रुपये आहे.

तस्करांची पद्धत बदलली : गेल्या काही दिवसांत सोन्याच्या तस्करांनी तस्करी करण्याची पद्धत बदलली आहे. यापूर्वी तस्करीचं सोनं विमानानं आणलं होतं. पण, आता तस्करांनी रेल्वेचा वापर केला आहे. काही दिवसांपूर्वीचं वाराणसी कॅंट रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात विदेशी चलन जप्त केल्यानंतर रेल्वेतून मोठ्या प्रमाणात अवैध सोनं जप्त करण्याची ही तिसरी घटना आहे.

ब्रह्मपुत्रा एक्स्प्रेसमधून तस्करांना अटक : म्यानमारमधून मोठ्या प्रमाणात विदेशी सोनं आणलं जात असून ते ब्रह्मपुत्रा एक्स्प्रेसनं दिल्लीला नेलं जात असल्याची माहिती डीआरआयच्या वाराणसी युनिटच्या अधिकाऱ्यांना मिळाली. माहिती मिळताच चंदौली नगर स्टेशन आऊटर येथील डीआरआय टीमचे अधिकारी ब्रह्मपुत्रा एक्सप्रेस ट्रेनमध्ये चढले. त्यांनी संशयितांचा शोध सुरू होता. ब्रह्मपुत्रा एक्स्प्रेसच्या बोगी क्रमांक एच 1 मध्ये शोध घेत असताना संशयित प्रवासी अरविंद आणि अमित यांची झडती घेतली. झडती घेताना त्यांच्या कमरेला कापड बांधलेलं आढळून आलं. ते कापड उघडलं असता त्यामधून तपकिरी टेपमध्ये गुंडाळलेली 16 सोन्याची बिस्किटे मिळाली. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ ही बिस्किटे जप्त केली. तसंच अमितच्याही कमरेला सोन्याची चार बिस्किटे सापडली. या दोघांना वाराणसी सिटी रेल्वे स्थानकावर उतरवून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलंय.

महाराष्ट्रातील एका तस्कराचा समावेश : पूर्वांचल राज्यात तस्करी करणाऱ्या महाराष्ट्र आणि तामिळनाडूतील दोन तस्करांच्या अटकेनंतर त्यांच्याकडून आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. सोन्याची तस्करी करणारे अरविंद चंद्रकांत हा तामिळनाडूतील कोईम्बतूर येथील तर अमित श्रीरंग जाधव हा महाराष्ट्रातील सांगली येथील रहिवासी आहे.

हेही वाचा :

  1. बेल्टमध्ये लपवून सुरू होती सोन्याची तस्करी; 1 किलो 700 ग्रॅम सोन्याची पेस्ट नागपूर विमानतळावर जप्त
  2. Gold Smuggling Case Mumbai: डीआरआयच्या ऑल इंडिया कारवाईत मुंबईतून 3 जणांना अटक, 8.5 कोटी रुपयांचे सोने जप्त
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.