ETV Bharat / bharat

Two NCP office bearers arrested : बंडखोर आमदार वास्तव्यास राहिलेल्या हॉटेलमध्ये तोतयागिरी? राष्ट्रवादीच्या 2 पदाधिकाऱ्यांना अटक

author img

By

Published : Jul 3, 2022, 7:55 AM IST

तोतयागिरीचा संशय तसेच बनावट ओळखपत्राच्या आधारे ताज हॉटेलमध्ये वास्तव्य करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन पदाधिकाऱ्यांना गोवा पोलिसांनी अटक केली आहे. हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी गेल्या दोन दिवसांपासून हॉटेल ताज कन्वेन्शन सेंटरमध्ये वास्तव्य करत होते. याच ठिकाणी शिवसेनेचे बंडखोर आमदार देखील वास्तव्यास होते. सोनिया दोहन ( Sonia Dohan arrested goa police ) आणि श्रेय कोटीहाल अशी या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची नावे आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Goa police arrest two NCP office bearers
राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी अटक गोवा पोलीस

गोवा (पणजी) - बनावट ओळखपत्राच्या आधारे ताज हॉटेलमध्ये ( Goa police arrest two NCP office bearers ) वास्तव्य करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन पदाधिकाऱ्यांना गोवा पोलिसांनी अटक ( NCP office bearers arrest goa ) केली आहे. याच हॉटेलमध्ये शिवसेनेच्या बंडखोर आमदार वास्तव्यास होते. हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी गेल्या दोन दिवसांपासून हॉटेल ताज कन्वेन्शन सेंटरमध्ये वास्तव्य करत होते. सोनिया दोहन ( Sonia Dohan arrested goa police ) आणि श्रेय कोटीहाल अशी या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची नावे आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा - Policeman Saved Elders Life : दलदलीत फसलेल्या ज्येष्ठाचे पोलिसाने वाचविले प्राण, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव

हॉटेलमध्ये तोतयागिरी करून तपासणी केल्याचा संशय - महाराष्ट्राचे आमदार तळ ठोकून होते त्या डोना पॉला येथील हॉटेलमध्ये तोतयागिरी करून तपासणी केल्याच्या संशयावरून गोवा पोलिसांनी शनिवारी दोघांना अटक केली. पणजी पोलीस निरीक्षक सूरज गवस यांनी सांगितले की, हरियाणातील एक आणि उत्तराखंडमधील दोन जणांना तोतयागिरी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांनी सांगितले की ते डोना पॉला येथील तारांकित हॉटेलमध्ये एक दिवस राहत होते. योगायोगाने हे तेच हॉटेल आहे जेथे महाराष्ट्राचे आमदार तळ ठोकून होते. परंतु, दोन्ही घटनांचा संबंध आहे की नाही? हे तपासात उघड होईल, असे गवस म्हणाले. पोलीस सूत्रांनी सांगितले की, दोघेही रिसॉर्टमध्ये तोतयागिरी करत असल्याचा संशय आल्याने त्यांना अटक करण्यात आले. 29 जूनपासून शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसह इतर अपक्षांनी तेथे चेकइन केल्याने गोवा पोलिसांनी रिसॉर्टमध्ये कडक बंदोबस्त ठेवला होता. गुवाहाटीहून हा ग्रुप रिसॉर्टमध्ये आला होता.

बंडखोर आमदार मुंबईला परतले - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी बंडखोरी करत राजकीय भूकंप केला होता. शिंदे यांनी शिवसेनेसह अपक्ष ५० हुन अधिक आमदारांना सुरत, गुवाहाटीमार्गे गोव्याला नेले होते. काल ( 2 जुलै ) तब्बल ११ दिवसांनंतर हे बंडखोर आमदार विमानाद्वारे मुंबईत परतले ( Rebel Shivsena Mla Arrived At Mumbai ) आहेत.

बंडखोर आमदार येत असल्याने तगडा बंदोबस्त - शिवसेनेतून बंडखोरी केलेले एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे आणि अपक्ष असे एकूण ५० हून अधिक आमदार सुरत मार्गे गुवाहाटी आणि त्यानंतर गोव्याला गेले होते. त्यानंतर, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर विधिमंडळात बहुमत सिद्ध करण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले आमदार गोव्याहून मुंबईमध्ये दाखल झाले. बंडखोर आमदार मुंबईत येत असल्याने मुंबई विमानतळापासून ताज प्रेसिडंट हॉटेलपर्यंत पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला. दरम्यान, आज ( 3 जुलै ) सकाळी १० वाजता हे सर्व आमदार विधानभवनात अध्यक्ष निवड व सोमवारी बहुमत चाचणीसाठी मतदानात सहभागी होणार आहेत.

हेही वाचा - Congress on Riyaz Attari : उदयपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी अटारी याचे भाजपशी जवळचे संबंध, काँग्रेसचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.