ETV Bharat / bharat

घरात बाता-सीमेवर लाथा!, 'सामना'तून मोदी सरकारवर प्रहार

author img

By

Published : Jan 4, 2022, 9:53 AM IST

Updated : Jan 5, 2022, 8:03 PM IST

घरात बाता व सीमेवर लाथा अशी आमची अवस्था चीनच्या बाबतीत दिसत आहे. (Samana Editorial On Galwan) गलवान व्हॅलीत चिन्यांनी त्यांचा झेंडा फडकविल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. हे चित्र धक्कादायक आहे. गलवान व्हॅलीत एक वर्षापूर्वी कर्नल संतोष बाबूसहित 20 हिंदुस्थानी जवानांना चिन्यांनी ठेचून मारले. (China Flag Hoisted In Galwan Valley) तेव्हाही फक्त शब्दांच्याच फैरी झडल्या. आता तर त्याही बंद झाल्या आहेत. असे म्हणत आजच्या सामना अग्रलेखातून मोदी सरकारला चांगलेच लक्ष करण्यात आले आहे.

सामनातून मोदी सरकारवर प्रहार
सामनातून मोदी सरकारवर प्रहार

मुंबई - गलवान व्हॅलीत चिन्यांनी त्यांचा झेंडा फडकविल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. घरात बाता व सीमेवर लाथा अशी आमची अवस्था चीनच्या बाबतीत दिसत आहे. हे चित्र धक्कादायक आहे. (China Galwan Valley गलवान व्हॅलीत एक वर्षापूर्वी कर्नल संतोष बाबूसहित 20 हिंदुस्थानी जवानांना चिन्यांनी ठेचून मारले. तेव्हाही फक्त शब्दांच्याच फैरी झडल्या. आता तर त्याही बंद झाल्या. (China Hoisting of flag In The Galwan Valley) उत्तर प्रदेशसह पाच राज्यांत ज्यांचा झेंडा फडकायचा तो फडकेल. सत्ता दहशत, केंद्रीय तपास यंत्रणांची फौज हाती असल्यावर विजयाचे झेंडे सहज फडकविता येतात, (Samana Editorial On China Flag Hoisted In Galwan) पण गलवानमध्ये लाल चिन्यांचा झेंडा उतरवून तिरंगा कधी फडकवणार, यावर काय ते बोला! असे म्हणत आजच्या सामना अग्रलेखातून मोदी सरकारला चांगलेच लक्ष करण्यात आले आहे.

गलवान व्हॅलीत घुसून चिन्यांनी सैनिकी संचलन केले

पंतप्रधान मोदींसह त्यांचे अर्धे मंत्रिमंडळ नेहमीप्रमाणेच विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात दंग झाले आहे. उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील निवडणुका जिंकून भाजपचा झेंडा फडकवायचा यासाठी मोदी व त्यांच्या कॅबिनेटने शर्थ चालवली आहे, पण याच काळात पूर्व लडाखजवळील गलवान व्हॅलीत लाल चिनी घुसले असून नववर्षदिनी चिन्यांनी त्यांचा राष्ट्रध्वज गलवान (Prime Minister Modi On Uttar Pradesh Elections) खोऱ्यात फडकवून हिंदुस्थानच्या सार्वभौमत्वास आव्हान दिले आहे. चीन सरकारने हिंदुस्थानच्या हद्दीत फक्त त्यांचा झेंडाच फडकविला असे नाही, तर या ध्वजारोहण सोहळ्याचे संपूर्ण चित्रीकरण करून तो व्हिडीओ अधिकृतपणे प्रसारित केला आहे. गलवान व्हॅलीत घुसून चिन्यांनी सैनिकी संचलन केले. (Uttar Pradesh Assembly Elections) ध्वज फडकविला, त्यांचे राष्ट्रगीत गायले. व्हॅलीत फलकही लावले की, 'आम्ही आमची एक इंच भूमीही सोडणार नाही.' हे सरळ सरळ आव्हान आणि चिथावणीच आहे. मात्र, पंतप्रधान मोदी किंवा त्यांच्या सरकारातील प्रमुख लोकांनी चिन्यांच्या या घुसखोरीवर साधे शाब्दिक आक्रमणही केले नाही. अशी खंत यामध्ये व्यक्त करण्यात आली आहे.

गलवान व्हॅली हिंदुस्थानी सैनिकांच्या रक्ताने भिजली

याचबरोबर हे सगळे होत असताना गलवान व्हॅलीत चिनी घुसले व त्यांनी त्यांचा झेंडा फडकविला ही बाब मोदी सरकारला, भारतीय जनता पक्षाला गंभीर वाटू नये? (5 मे 2020)रोजी याच व्हॅलीत आपल्या सैनिकांची चिन्यांबरोबर रक्तरंजित झटापट झाली होती. त्यात आमचे वीसेक सैनिक शहीद झाले. गलवान व्हॅली हिंदुस्थानी सैनिकांच्या रक्ताने भिजली. त्या सर्व शहीद सैनिकांच्या शौर्याचा सन्मान हिंदुस्थान सरकारने केला, पण वर्षभरातच चिनी सैनिक त्याच प्रदेशात आक्रमण करून घुसले व देशाच्या राजधानीत साधी सळसळही झाली नाही.(Video of Chinese flag-hoisting in Galwan Valley) उत्तर प्रदेशातील एका अत्तर व्यापाऱ्याकडे आयकर विभागाने धाडी घालून शे-दोनशे कोटी रुपये पकडले. त्यावर पंतप्रधान व त्यांचे सहकारी जाहीर सभांतून भाषणे ठोकतात, पण गलवान व्हॅलीत चिन्यांनी झेंडा फडकविला यावर बोलत नाहीत. अशी उघड नाराजी यामध्ये व्यक्त करण्यात आली आहे.

पाकड्यांची कळ जेवढी जोरात लागते तेवढी चिन्यांची लागत नाही

दरम्यान, पंतप्रधान व त्यांचे सहकारी विरोधकांना संपविण्याची व पराभूत करण्याची भाषा जोरकसपणे करतात, पण घुसलेल्या चिन्यांचे ते नाव घेत नाहीत. चिन्यांना धडा शिकवायचे ते बोलत नाहीत. राजकीय विरोधकांचे काय करायचे ते नंतर पाहता येईल, पण चीनसारख्या देशाच्या दुष्मनांकडे आधी पाहायला हवे. असा टोलाही त्यांनी लगावला आहे. चीनची घुसखोरी लडाखच्या गलवान व्हॅलीपुरतीच मर्यादित नाही.(Chinese flag at the Galwan Valley) अरुणाचल, उत्तराखंड, सिक्कीम प्रांतातही चीन घुसखोरी करीत आहे. अरुणाचल प्रदेशातील 15 ठिकाणांची नावे चीनच्या नकाशावर परस्पर बदलून चिन्यांनी आपली कळ काढली आहे, पण पाकड्यांची कळ जेवढी जोरात लागते तेवढी चिन्यांची लागत नाही. याचे कारण असे की, पाकिस्तानशी संघर्ष केला की हिंदुस्थानात निवडणुकीच्या तोंडावर हिंदू-मुसलमान असा झगडा पेटवता येतो. दुसरे म्हणजे पाकिस्तान हा एक कमजोर, तितकाच विस्कळीत देश आहे. त्यामुळे पाकड्यांना दम भरणे, डोळे वटारणे, एखादा सर्जिकल स्टाईक करून शौर्य गाजविण्याचा आव आणणे सोपे असते. चीनच्या बाबतीत ते सोपे नाही. असही यामध्ये म्हटले आहे.

चीनच्या कर्जामुळे श्रीलंका कंगाल झाली आहे व चीनपुढे गुडघे टेकून बसली आहे

चीनचे किमान 20 टक्के आर्थिक सामर्थ्य हिंदुस्थानच्या व्यापारावर अवलंबून आहे, पण चिनी व्यापारावर बंदी घालण्याची हिंमतही आमचे शूरवीर केंद्र सरकार दाखवू शकले नाही. विरोधी पक्षांच्या अर्थवाहिन्या बंद करण्यासाठी आमचे केंद्र सरकार जेवढे झपाटल्यासारखे काम करते तेवढे झपाटलेपण ते चीनची आर्थिक नाकेबंदी करताना दाखवीत नाही. हे गौडबंगाल नसून चीनसमोर टाकलेली नांगी आहे. कश्मीरात पाकड्यांच्या कारवाया चीनच्या पाठिंब्याने सुरू आहेत. नेपाळ व श्रीलंकेत चीनने पाय रोवले आहेत. चीनच्या कर्जामुळे श्रीलंका कंगाल झाली आहे व चीनपुढे गुडघे टेकून बसली आहे. पाकिस्तान व नेपाळला तर चीनने विकतच घेतले आहे. अरुणाचल प्रदेशात, लडाखमध्ये चीनने हात-पाय पसरले. हिंदुस्थानच्या हद्दीत चीनने स्वतःची दळणवळण यंत्रणा निर्माण केली आहे. त्यावर एखादा सर्जिकल स्ट्राईक करण्याची हिंमत आपल्यात आज आहे काय? असा प्रश्नही उपस्थित केला आहे.

चिन्यांचा झेंडा उतरवून तिरंगा कधी फडकविणार?

देशाचे पंतप्रधान, संरक्षणमंत्री व त्यांच्या सायबर फौजा समाज माध्यमांवर शौर्याच्या व लढण्याच्या तोफा उडवतात, पण प्रत्यक्षात गलवान व्हॅलीत चिन्यांनी त्यांचा झेंडा फडकविल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. घरात बाता व सीमेवर लाथा अशी आमची अवस्था चीनच्या बाबतीत दिसत आहे. हे चित्र धक्कादायक आहे. गलवान व्हॅलीत एक वर्षापूर्वी कर्नल संतोष बाबूसहित 20 हिंदुस्थानी जवानांना चिन्यांनी ठेचून मारले. तेव्हाही फक्त शब्दांच्याच फैरी झडल्या. आता तर त्याही बंद झाल्या. उत्तर प्रदेशसह पाच राज्यांत ज्यांचा झेंडा फडकायचा तो फडकेल. सत्ता, दहशत, केंद्रीय तपास यंत्रणांची फौज हाती असल्यावर विजयाचे झेंडे सहज फडकविता येतात, पण गलवानमध्ये लाल चिन्यांचा झेंडा उतरवून तिरंगा कधी फडकविणार, यावर काय ते बोला! असा टोलाही मोदी सरकारला यामध्ये लगावला आहे.

हेही वाचा - गोव्यातही महाविकास आघाडी स्थापन करणार - संजय राऊत

Last Updated : Jan 5, 2022, 8:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.