ETV Bharat / bharat

नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधी यांची चौकशी?, 13 जूनला ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहणार

author img

By

Published : Jun 3, 2022, 12:54 PM IST

नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची चौकशी होणार आहे. यासाठी त्यांना आता 13 जूनला ईडीच्या कार्यालयात जावे लागणार आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी
काँग्रेस नेते राहुल गांधी

नवी दिल्ली - नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधींना आता 13 जून रोजी अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर राहावे लागणार आहे. ईडीने राहुल आणि सोनियांना समन्स पाठवले होते. यानंतर राहुल गांधी यांनी तपास यंत्रणेकडे नवीन तारीख मागितली होती. या प्रकरणी सोनिया गांधी यांना ८ जून रोजी तपासात सहभागी व्हायचे आहे. सोनिया अजूनही कोरोना पॉझिटिव्ह आहेत, परंतु काँग्रेसने स्पष्ट केले आहे की त्या 8 जून रोजी ईडीसमोर हजर होतील.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनंतर आता प्रियंका गांधी यांनाही कोरोनाचा फटका बसला आहे. प्रियांकाने सांगितले की, तिच्यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका यांनी स्वत:ला वेगळे केले आहे. त्यांनी अभ्यागतांना सर्व आवश्यक प्रोटोकॉल पाळण्याचा सल्ला दिला आहे. यापूर्वी 1 जून रोजी सोनियांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याच दिवशी सेवादलाने आयोजित केलेल्या गौरव यात्रेच्या कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या होत्या.


काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही ईडीकडून चौकशी होणार आहे. त्यांना ईडीने चौकशीसाठी ८ जून रोजी बोलावले आहे. मात्र, सोनिया गांधी यांना कालच कोरोना झाला आहे. त्यामुळे त्यांच्या जाण्याबद्दल संधिग्दता आहे. तसेच, राहुल गांधी हे विदेश दौऱ्यावर असल्याने त्यांनीही आपल्याला 2 जूनला उपस्थित राहता येणार नाही असे कळवल्यानंतर त्यांना आता 13 जुन ही तारीख देण्यात आली आहे.

२०१२ मध्ये नॅशनल हेराल्डचा मुद्दा चर्चेत आला. त्यानंतर भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्रायल कोर्टात याचिका दाखल करून आरोप केला की, काही काँग्रेस नेत्यांनी यंग इंडियन लिमिटेड (YIL) मार्फत चुकीच्या पद्धतीने असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडचे ​​अधिग्रहण केले आहे.

हेही वाचा - पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज सिद्धू मुसेवालाच्या कुटुंबाची भेट घेतली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.