ETV Bharat / bharat

Center Approves Proposals : केंद्राने सशस्त्र दलांसाठी 'इतक्या' कोटी रुपयांच्या प्रस्तावांना दिली मंजुरी

author img

By

Published : Dec 23, 2022, 11:27 AM IST

Center approves proposals
संरक्षण संपादन परिषद

संरक्षण संपादन परिषदेने गुरुवारी स्वदेशी स्त्रोतांकडून खरेदीसाठी भांडवल संपादन प्रस्तावांसाठी मंजुरी दिली (Center approves proposals for armed forces) आहेत. या खरेदी यादीमध्ये सैनिकांसाठी अधिक चांगल्या संरक्षण पातळीसह बॅलिस्टिक हेल्मेट खरेदीचा समावेश (Rs 84 328 crore for armed forces) आहे. या प्रस्तावांमध्ये भारतीय लष्कर, हवाई दल, नौदल तटरक्षक दलासांठी प्रस्तावांचा समावेश आहे.

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defense Minister Rajnath Singh) यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण संपादन परिषदने गुरुवारी 24 भांडवल संपादन प्रस्तावांसाठी मंजुरी दिली. या प्रस्तावांमध्ये भारतीय लष्करासाठी सहा, हवाई दलासाठी सहा, नौदलासाठी 10 आणि तटरक्षक दलासाठी दोन प्रस्तावांचा समावेश आहे. एकूण 84,328 कोटी रुपयांचे प्रस्ताव (Center approves proposals for armed forces) आहेत. संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, नवीन श्रेणीच्या क्षेपणास्त्र प्रणाली, लांब पल्ल्याच्या उच्च-स्फोटक वॉरहेड्स, पारंपारिक वारहेड्ससाठी श्रेणी वाढवणारी किट आणि प्रगत पाळत ठेवणारी यंत्रणा समाविष्ट करून भारतीय वायुसेना अधिक प्राणघातक क्षमतेसह अधिक बळकट केली जाईल.

नौदलाची क्षमता : मंत्रालयाने सांगितले की, भारतीय सैन्याला अधिक प्लॅटफॉर्म आणि उपकरणे जसे की लढाऊ वाहने, हलके टँक आणि माउंटेड गन सिस्टम सुसज्ज करण्याची तयारी सुरू (Center Approves Proposals) आहे. संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले की, या यादीमध्ये आमच्या सैनिकांसाठी अधिक चांगल्या संरक्षण पातळीसह बॅलिस्टिक हेल्मेट खरेदीचा देखील समावेश आहे. नौदलाची जहाजविरोधी क्षेपणास्त्रे, बहु-भूमिका जहाजे आणि उच्च-सहनक्षम स्वायत्त वाहनांच्या खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयाच्या मंजुरीमुळे नौदलाची क्षमता आणि सागरी शक्ती आणखी (proposals for armed forces) वाढेल.

सशस्त्र दलांचे आधुनिकीकरण : संरक्षण मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, स्वदेशी स्त्रोतांकडून खरेदीसाठी 82,127 कोटी रुपयांचे 21 प्रस्ताव मंजूर करण्यात आले (Rs 84 328 crore for armed forces) आहेत. डीएसीच्या या अभूतपूर्व उपक्रमामुळे केवळ सशस्त्र दलांचे आधुनिकीकरण होणार नाही, तर 'आत्मनिर्भर भारत'चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संरक्षण उद्योगालाही भरीव चालना मिळेल. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारतीय तटरक्षक दलासाठी पुढील पिढीच्या ऑफशोर गस्ती जहाजांच्या खरेदीमुळे किनारी भागात पाळत ठेवण्याची क्षमता नवीन उंचीवर (approves proposals worth Rs 84 328 crore) जाईल.

संयुक्त सरावाचा उद्देश : आणखी एका उपक्रमात, भारत आणि जपान यांचा पहिला द्विपक्षीय लष्करी सराव जपानमध्ये करणार आहेत. 'वीर गार्डियन 23' नावाचा हा सराव 16 ते 26 जानेवारी 2023 या कालावधीत आयोजित केला जाईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांच्या हवाई दलांमध्ये परस्पर सामंजस्य वाढवणे आणि संरक्षण सहकार्य मजबूत करणे, हा या संयुक्त सरावाचा उद्देश आहे. हवाई दल आपले रशियन वंशाचे सुखोई-30 एमकेआय विमान वेस्टर्न एअर कमांडच्या स्क्वॉड्रनमध्ये सामील (armed forces) करेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.